Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

समर्थ वार्तापत्र

समर्थ वार्तापत्र

सोलापूरच्या आदित्य कोडमुर या तरुण जादूगाराने अपेक्षा उंचावल्या.

 ‘एक मिनीटात जास्तीत जास्त पत्ते कलिंगडात रुततील असे फेकून मारण्याच्या’ गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रयासासह सोलापूरच्या आदित्य कोडमुर या तरुण जादूगाराने अपेक्षा उंचावल्या.

 

आपल्याकडील असामान्य प्रतिभेच्या प्रदर्शनाने भारत जगभरात आपला ठसा उमटवत आहे. देशातील वैविध्यपूर्ण प्रतिभेला नवीन संधी उपलब्ध करून देणारा असाच एक मंच म्हणजे सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील लोकांचा लाडका रियालिटी शो- इंडियाज गॉट टॅलेंट. ‘विजयी विश्व हुनर हमारा’ हे या शोचे यंदाचे ब्रीद असून पहिल्या आठवड्यात स्पर्धकांनी सादर केलेल्या नेत्रदीपक अॅक्ट्समुळे आणि त्यांच्या अनोख्या कौशल्याच्या प्रदर्शनामुळे प्रेक्षकांकडून या आंतरराष्ट्रीय फॉरमॅटचे खूप कौतुक होत आहे. या शोच्या यंदाच्या विशेष अशा 10 व्या सत्रात ‘हुनर’वर प्रकाश झोत असेल आणि प्रत्येक अॅक्टनंतर कार्यक्रमाचा दर्जा आणि प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावत जातील. या वीकएंडला प्रेक्षक इतिहास घडताना बघतील, कारण, स्पर्धेतील 6 स्पर्धक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहेत.

सोलापूरहून आलेला आदित्य कोडमुर हा तरुण एक थक्क करून सोडणारा अॅक्ट करताना दिसेल. या आधीच त्याने 3 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडले आहेत. आता तो ‘एका मिनिटात जास्तीत जास्त पत्ते कलिंगडात रुततील असे फेकून मारण्याचा’ गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणार आहे. पत्त्यांनी काही तरी वेगळे करण्याच्या प्रयत्नात आदित्यने हे अनोखे कौशल्य प्रचंड सराव आणि निष्ठेने विकसित केले आहे.

आदित्यचे हे अनोखे कौशल्य पाहून परीक्षक शिल्पा शेट्टी म्हणाली, “अनेक जादूगारांना मी पत्त्यांनी जादूचे प्रयोग करताना पाहिले आहे, पण अशा प्रकारची जादू, तीही पत्त्याने करताना मी पहिल्यांदाच बघत आहे. हे खूप आगळेवेगळे आणि खतरनाक देखील आहे. अप्रतिम!”

अधिक जाणून घेण्यासाठी बघायला विसरू नका, इंडियाज गॉट टॅलेंट सीझन 10, या शनिवारी आणि रविवारी रात्री 9:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.