संथ गतीने सुरू असलेला रस्ता तात्काळ दुरुस्त करावा : काँग्रेसचे उपाध्यक्ष लकी गोवर्धने यांचा आंदोलनाचा इशारा
लक्ष्मण सोनवणे / इगतपुरी......इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव रस्त्याचे काम अतिशय धीम्या गतीने सुरू असल्याने सतत अपघात घडत आहे. भंबाळे फाट्याजवळ आज सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास दोन दुचाकीच्या झालेल्या अपघातात तीन जण गंभीर झाल्याची घटना घडली तर एक जण किरकोळ जखमी झाला आहे. मोटारसायकल क्रमांक एम एच 15 ए एन 5773 व बुलेट क्रमांक एम एच 3 डी एच 9783 अपघातातील वाहन सांजेगाव कडून वाडीवऱ्हेकडे येत असताना दोन्ही मोटारसायकलची समोरा समोर जोरदार धडक झाली. त्यात कार्तिक कृष्णा कुवा वय 26, राहुल दिनेश गावित वय 21, गोविंद पोपट ठाकरे वय 26 राहणार मोहपाडा ता कळवण, नामदेव मनोहर गायकर 45 राहणार आहुरली हे गंभीर जखमी झाले. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या मोफत रुग्ण वाहिकेचे रुग्णवाहक निवृत्ती पाटील गुंड यांनी तात्काळ जखमींना नासिक येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
सदर रस्त्याचे गेल्या वर्षभरापासून महिन्यांपासून संत गतीने काम सुरू असून रस्त्यावर सतत अपघात घडत आहेत. या रस्त्यावर दिवसेंदिवस अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली असून रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी होत असूनही सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत आहे.
मुदत संपत आली तरी रस्ता दुरुस्त होत नाही सदर रस्ता दुरुस्त करावा अन्यथा आंदोलनाचा इशारा काँग्रेसचे उपाध्यक्ष लकी गोवर्धने यांनी दिला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सुस्त कारभाराबाबत नागरिक संताप व्यक्त करीत आहे. गेल्या एक वर्षापासून या रस्त्याने काम धीम्या गतीने काम सुरू आहे. मार्च पर्यंत कामाची मुदत असताना मार्च महिना संपत आला तरी काम अजून अर्धे पण झाले नाही. गेल्या दोन महिन्यापूर्वी वामन काळे रा. सांजेगाव नामक व्यक्तीचा याचं रस्त्याच्या खड्या मुळे जीव गमवला. अश्या सतत छोट्या मोठ्या अपघाताचे सत्र सुरूच असून सार्वजनिक बांधकाम सदर रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसचे उपाध्यक्ष लकी गोवर्धने यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिकानी दिला आहे

