मंत्री छगन भुजबळ यांच्या सुचनेनुसार प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे यांच्याकडून कामाची पाहणी
विंचूर.....
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या सुचनेनुसार लासलगाव विंचूरसह सोळागाव पाणी पुरवठा योजनेच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. या योजनेत नव्याने टाकण्यात येत असलेल्या साडेसह किलोमीटर पाईप लाईन पैकी अडीच किलोमीटर पाईपलाईनची चाचणी यशस्वी झाली आहे.
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या सुचनेनुसार आज प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे यांनी आज लासलगाव विंचूरसह सोळागाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या कामाची पाहणी केली. यावेळी समितीचे अध्यक्ष तथा लासलगावचे सरपंच जयदत्त होळकर, पाणी पुरवठा योजनेचे उपभियंता श्री.निकम, पांडुरंग राऊत, छगन भुजबळ यांचे स्वीय सहायक अशोक गालफाडे, मंगेश गवळी, विलास गोरे, नानासाहेब जेऊघाले, इस्माईल मोमीन, भाऊराव दराडे, मोसिन शेख, संजय घायाळ, हेमंत पवार, अनिल विंचूरकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
लासलगाव विंचूरसह सोळागाव पाणी पुरवठा योजनेच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु असून साडेसहा किलोमीटर पाईप लाईनचे काम सुरु आहे. त्यापैकी आज अडीच किलोमीटर पाईपलाईनची चाचणी यशस्वी झाली आहे. आज कादवा नाल्यात या पाईपलाईनची चाचणी करण्यात आली आहे. दि.१० ऑगस्ट पर्यंत या योजनेतील पाईप लाईनचे काम पूर्ण होणार असून त्यांतर पूर्ण नूतन पाईप लाईनची चाचणी होऊन पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे.


