*मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार जिल्हा नियोजनच्या माध्यमातून होणार रस्त्याचे काम पूर्ण*
*लासलगाव,दि.३ ऑगस्ट:-*
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार लासलगाव बाजार समितीकडून विंचूर बाह्य वळण रस्त्यावर असलेल्या ग्रामीण रुग्णालयाकडे जाणाऱ्या एक किलोमिटर अंतराच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार जिल्हा नियोजनच्या माध्यमातून या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार आज प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे यांनी लासलगाव ग्रामीण रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची पाहणी केली.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता घोडे, शाखा अभियंता गणेश चौधरी, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे शाखा अभियंता गायकवाड, छगन भुजबळ यांचे विशेष कार्यकारी अधिकारी उदयसिंग राजपूत, स्विय सहायक बाळासाहेब लोखंडे, अशोक गालफाडे, पांडुरंग राऊत, विलास गोरे, अनिल विंचूरकर, ओम राऊत यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
लासलगाव ग्रामीण रुग्णालाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाल्याने तातडीने या रस्त्यावरील खड्डे भरण्यात येणार आहे. तसेच जिल्हा नियोजन निधीच्या माध्यमातून लासलगाव ग्रामीण रुग्णालयाकडे जाणाऱ्या या एक किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे काम करण्यात येणार आहे.


