महामार्गावर अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करा : कृष्णा गभाले
इगतपुरी ( प्रतिनिधी )
घोटी सिन्नर शिर्डी महामार्गावर काल बुधवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास अवजड वाहन नादुरुस्त झाल्याने पाच ते सहा तास वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय निर्माण झाली होती. महामार्गावर वाहनांच्या लांबचब लांब रांगा लागल्या होत्या. अशा परिस्थितीत पावसाची पर्वा न करता वेळेचे गांभीर्य राखून स्वराज्य संघटनेचे संघटक कृष्णा गभाले यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासासाठी अथक प्रयत्न केल्याने वाहतूक अखेर सुरळीत झाली आहे. घोटी सिन्नर महामार्गावर शिर्डी भंडारदरा जाण्यासाठी प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते मात्र महामार्गावर साईट पट्टी नसल्यामुळे सतत अपघात होतात. येथे अपघात रोखण्यासाठी सदर विभागाने उपाययोजना कराव्यात अन्यथा प्रदेशाध्यक्ष करण गायकर, जिल्हाप्रमुख डॉ. रुपेश नाठे, उप जिल्हाप्रमुख डॉ. महेंद्र शिरसाठ, शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष नारायण जाधव, तालुकाध्यक्ष नारायण राजे भोसले, उपाध्यक्ष सखाराम आप्पा गव्हाणे, विद्यार्थी सेना ऋतिक जाधव, युवा तालुकाध्यक्ष गोकुळ धोंगडे, संपर्कप्रमुख शिवाजी बाबा गायकर, सहकार आघाडी तालुका प्रमुख हरीश कुंदे,कैलास गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचा इशारा स्वराज्य संघटक कृष्णा गभाले यांनी दिला.
यावेळी स्वराज्य शाखाप्रमुख उमेश सुरुडे, भैयासहेब फड, प्रशांत सुरुडे, विजय परदेशी, सुदाम वाजे, जालिंदर अण्णा सुरूडे, गोटिराम खातळे, शुभम सुरुडे, निखिल सुरुडे, पांडुरंग महाराज रंदे, विशाल सुरडे, सचिन गभाले, हरीश सोनकांबळे शाखाप्रमुख गौरव गभाले, श्रीराम गभाले, किरण गायकवाड, ईश्वर गायकर, प्रशांत गभाले, गणेश गोणके, बाळासाहेब सुरुडे, हेमंत शेळके, कैलास भोर आदी स्वराज्य पदाधिकारी उपस्थित होते.


