Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

समर्थ वार्तापत्र

समर्थ वार्तापत्र

जागतिक आदिवासी दिनानिमित्त आमदार हिरामण खोसकर यांचे उपस्थितीत घोटी येथे जाहीर शोकसभेचे आयोजन

 

इगतपुरी 

दरवर्षी आनंदोत्सवात व उत्साहात साजऱ्या होणाऱ्या  जागतिक आदिवासी दिनावर या वर्षी दुःखाचे सावट असल्याने आनंदावर विरजण पडले.  रायगड (ईर्शाळवाडी) येथे भुसख्खलन होऊन स्थानिक आदिवासींचा दुर्देवी मृत्यू झाल्याने व मणीपुर येथील आदिवासी महिलेवरील झालेल्या अत्याचाराचे निषेधार्थ आज जैन भवन घोटी येथे जाहीर शोकसभेचे आयोजन संतोष रौंदळ , पंडीत खेताडे,  यांनी केले होते.यावेळी महापुरुषांच्या प्रतीमेला वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. व्यासपिठावर आमदार हिरामण खोसकर,  माजी आमदार पांडुरंगबाबा गांगड , माजी आमदार शिवराम झोले, माजी सभापती गोपाळ लहांगे , अनिताताई घारे ,वनिताताई नारळे, कैलास घारे , हिरामण कवटे, सुरेश भांगरे आदींनी मनोगत व्यक्त केले. 

देशाचे स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण होत असतांना मणीपुर येथील आदिवासी महिलेवरील झालेले अत्याचार व निर्घुण हत्या ही अतिशय खेदजनक निंदनिय व घ्रुणास्पद बाब असुन खरोखर आपला देश प्रगतीपथावर व आधुनिकतेकडे वाटचाल करतोय का ? असा सवाल उभा राहतो आहे. यावेळी उपस्थितांनी घडलेल्या घटनेचा तिव्र निषेध व्यक्त करत मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. आदिवासी समाजावर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी आदिवासी समाजाने आपसातले मतभेद, हेवेदावे सोडुन ऐकत्र येणे हि काळाची गरज आहे असे आवाहन माजी सभापती गोपाळ लहांगे यांनी केले. आदिवासी तरुणांमध्ये वाढत चाललेली व्यसनाधीनता हि चिंतेची बाब असल्याची खंत माजी आमदार पांडुरंगबाबा गांगड यांनी केली.आदिवासींचे विकासासाठी मुलभुत सोयी सुविधांसाठी कुठे कमी पडणार नाही असे आश्वासन आमदार हिरामण खोसकर यांनी दिले. याप्रसंगी  प्रकाश करवंदे,  छगन गोडे, योगेश माणके, प्रवीण घारे, चेतन घारे, किशोर घारे, विलास कुंदे , जगन पोटकुले , शाम घोटकर, बाळासाहेब झोले,  आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा नेते कैलास घारे यांनी केले तर आभार हिरामण कौटे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.