एकलहरे रोड परिसरात अरिंगळे फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपण
इगतपुरी ( प्रतिनिधी )
वृक्षारोपण करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. प्रत्येकाने एक झाड तरी लावावे जेणेकरून भविष्यात पर्यावरण संतुलित राहण्यास मदत होईल. व पावसाचे आगमनही वेळेवर होईल. वृक्षारोपण करणे ही एक सामाजिक जबाबदारी असून प्रत्येकाने या कार्यास हातभार लावावा असे आवाहन अरिंगळे फाउंडेशनच्या नाशिक जिल्हाध्यक्षा दिपाली अरिंगळे -झोंड पाटील यांनी केले. एकलहरे रोड परिसरात अरिंगळे फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी त्या बोलत होत्या.
नाशिकची अरिंगळे फाउंडेशन ही एक सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य संस्था कार्यरत असून संस्थे मार्फत नेहमी सामाजिक, शैक्षणिक, व आरोग्य विषयक कार्यक्रम राबवले जातात. याप्रसंगी परिसरात विविध प्रकारच्या फळ झाडांची मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात आली.
यावेळी सागर अरिंगळे, योगेश झोंड, प्रज्योत डेरे, ऋतुजा अरिंगळे,ऋषिकेश काजळे, दिनकर अरिंगळे, प्रविण झोंड, सुभाष सहाणे आदी उपस्थित होते. वृक्षवल्ली आम्हा सोयरे या तुकाराम महाराजांच्या अभंगात देखील वृक्षांचे महत्व असून यात संदेश देण्यात आला असून वृक्षांची लागवड करून ते जतन करणेही तितकेच गरजेचे आहे. पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासासाठी वृक्ष जतन करण्याचा पुढाकार घ्यावा असेहीअरिंगळे फाउंडेशनच्या नाशिक जिल्हाध्यक्षा दिपाली अरिंगळे -झोंड पाटील यांनी सांगितले.

