हुतात्मा स्मारक स्वातंत्र सैनिक समितीचे अध्यक्ष विजय राऊत यांनी व्यक्त केले मत
नाशिक – ९ ऑगस्ट १९४२ रोजी देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ‘छोडो भारत’ आंदोलनाची गर्जना केली. याच दिवशी गांधीजींचा ‘करेंगे या मरेंगे’ हा मंत्र देशातील हजारो तरुणांच्या नसानसात भिनला होता. देशभरातील नागरिक या आंदोलनातून उतरले. हे आंदोलन देशाच्या स्वातंत्र्य लढ्याला मुख्य वळण देणारे आंदोलन ठरले असे मत हुतात्मा स्मारक स्वातंत्र सैनिक समितीचे अध्यक्ष विजय राऊत यांनी व्यक्त केले.
९ ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने नाशिकच्या हुतात्मा स्मारक येथे स्वातंत्र्य सैनिक समिति नाशिक यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन करण्यात आले.सुरवातील स्वातंत्र्य सैनिक कै.सरस्वती यांच्या पत्नी सरस्वती बाबाराव मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी हुतात्मा स्मारक स्वातंत्र सैनिक समितीचे अध्यक्ष विजय राऊत ,मनपा जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद,कौसल्या मणियार,सुमन मणियार,सत्यभामाबाई मोजाड,लीलाबाई बिरार,सरस्वती मोरे,प्रभाकर क्षिरसागर,सुनील साळवे,मिलिंद तांबे,वसंतराव जाधव,मुकुंद रानडे,लीलाधर बेंद्रे,दिलीप जुन्नरे,महेश गायकवाड,सचिन दप्तरे,अभिजीत राऊत यांच्यासह तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शासनाच्यावतीने ९ ऑगस्ट ते १५ मेरी मिट्टी मेरा देश या अभियानाचा देखील हुतात्मा स्मारक येथे शुभारंभ करण्यात आला.हुतात्मा स्मारक स्मारक परिसराची माती कलश मध्ये जमा करत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मनपा जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली.यावेळी भारत माता कि जय ,वंदे मातरम घोषणा देण्यात आल्या.योगेश कमोद यांनी उपस्थितांना पंचप्रण शपथ दिली.

