Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

समर्थ वार्तापत्र

समर्थ वार्तापत्र

*ब्रम्हमुर्ती दामोदर महाराज खेडगांवकर यांचे कार्य अलौकिक-हभपश्री आण्णासाहेब महाराज आहेर हिसवळकर*.

त्र्यंबकेश्वर:

अज्ञानी,जड,मुढ,गरीब,आदिवाशी,सधन, सुशिक्षित,अशिक्षित,पतित,लहानथोर या सर्वांना मार्गदर्शन,व्यसनमुक्ती, हुंडाबळी,अंधश्रद्धा,आध्यात्म प्रचार प्रसार,परमार्थाची योग्य दिशा देण्याचे सुत्रधार वारकरी पंथाचे नांव उज्वल करुन आश्रम,मंदिर निर्माते, हरिनाम सप्ताहाचे आयोजक,अन्नदानसत्र असे महान सेवा कार्य करणारे ब्रम्हमुर्ती हभप वै. दामोदर महाराज खेडगावकर खरोखर महान अवलिया संत विभुती होते, त्यांनी केलेले कार्य अलौकिक आहे असे भावोद्गार वारकरी महामंडळ नाशिक अध्यक्ष हभपश्री आण्णासाहेब महाराज आहेर हिसवळकर यांनी व्यक्त केले, अधिक मासाचे औचित्य साधुन त्र्यंबकेश्वर येथे दामोदर महाराज खेडगांवकर आश्रमात सदगुरु वै.ब्रम्हमुर्ती प.पुज्य दामोदर महाराज खेडगांवकर यांचे पुण्यतिथीचे औचित्य साधून किर्तन महोत्सव,काकडा, हरिपाठ,अन्नदान, दिंडी,भजन,नामचिंतन प्रवचन,किर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,कार्यक्रमास वै. दामोदर महाराज आश्रम ट्रस्ट मंडळाचे हभपश्री मोहनराव बुवा चाफेकर,हभपश्री दिनेशभाई ठक्कर,हभपश्री रामभाऊ बुवा आंबरे,हभपश्री एकनाथ बुवा पिंपळे, हभपश्री मोहन बुवा आमरे, हभपश्री शरद बुवा माळी, हभपश्री दत्ता बुवा चाफेकर,हभपश्रीशामभाऊ काळे, हभपसौ वंदनाताई चाफेकर, हभपसौ सुनंदाताई चाफेकर भिवंडी,हभपश्री सुरेश बुवा खोडे, हभपश्री रामदास बुवा जाधव खेलदरीकर, पिंपळगांवब,हभपश्रीदवंगे खेडगाव,अजंगवडेल वारकरी भजनी मंडळ हभपश्री थेटे उंबरखेड, हभपश्री समाधान ढगे बेलगांव ढगा, शांताराम बुवा चव्हाण, दत्तात्रय मते, वासाळी, हभपश्री दिनकर बुवा खांडबहाले, हभपश्री शिवाजी बुवा खांडबहाले महिरावणी,शिवडा पांढुर्ली भजनी मंडळाचे हभपश्री राजाराम बुवा वाघ, हभपश्री वाघ,गायक हभपश्री बोडके नांदुरशिंगोटे येथील भाविक वारकरी कार्यक्रमास आवर्जुन उपस्थित होते, हभपश्री भरत महाराज ठाकरे, हभपश्री रमेश महाराज काळे,यांची प्रवचने,हभपश्री भरत महाराज वाघ शिवडा,हभपश्री पंढरीनाथ महाराज घुमरे उंबरखेड, यांचे काल्याचे किर्तन व महाप्रसादाने उत्सवाची सांगता झाली.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.