Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

समर्थ वार्तापत्र

समर्थ वार्तापत्र

विष्णूनगर येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दिन साजरा

विष्णूनगर ग्रामपंचायतचे ध्वजवंदन करताना सैन्य दलातील जवान सुनील कुऱ्हाडे.

विंचूर ता.१५...

विष्णूनगर येथील जिल्हा परिषद शाळेत ,ग्रामपंचायत, देव मारुती देवस्थान ट्रस्ट येथे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. 

       जिल्हा परिषद शाळेचे ध्वजवंदन बाळकृष्ण भडांगे, ग्रामपंचायतीचे ध्वजवंदन सैन्य दलातील जवान सुनील कुऱ्हाडे, देव मारुती देवस्थान ट्रस्टचे ध्वजवंदन राजेंद्र घायाळ यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान जिल्हा परिषद शाळेत स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सव कोणशीळाचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 

        ग्रामपंचायत च्या वतीने सैन्य दलात असलेल्या जवानांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर सुट्टीवर आलेल्या सैन्य दलातील जवानांनी आपले मनोगत व्यक्त केले.शिवाजी सुखदेव घायाळ यांच्याकडून शाळेतील मुलांना पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनावर वेगवेगळ्या भाषेत भाषणे केली."ए मेरे वतन के लोगो जरा आँख में भर लो पानी" या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

         यावेळी शाळेचे मुख्याध्यापक विलास फड, उपशिक्षक विष्णू मापारी, सरपंच मंगला घायाळ, उपसरपंच नामदेव घायाळ, काशिनाथ गावडे, विलास जेऊघाले, संतोष घायाळ, वाल्मीक घायाळ, विष्णू घायाळ, संजय घायाळ, बाळासाहेब पाटील,ग्रामपंचायत कर्मचारी अमोल घायाळ, सैन्य दलातील जवान मनोज घायाळ, सेवानिवृत्त जवान पांडुरंग शेळके,मच्छिंद्र गावडे, ज्ञानेश्वर घायाळ, अनिल देसले, ज्ञानेश्वर देसले, राजेंद्र भडांगे, पोलीस पाटील रामकिसन सुराशे, अंगणवाडी सेविका उषा मोहन, सरला मुरकुटे, विष्णू मवाळ, कैलास जेऊघाले, हेमंत घायाळ आदींसह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.