विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी स्थानिक सल्लागार समिती सदस्य पंढरीनाथ दरेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर विद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, ध्वजगीत, देशभक्तीपर गीत गायन करून ध्वजास मानवंदना देण्यात आली.
विद्यालयाचे प्राध्यापक एस. डी.शिंदे यांनी भारतीय संविधानाचे वाचन केले.स्काऊट गाईड व एमसीसी पथकांनी संचलनाने ध्वजास व उपस्थित मान्यवरांना मानवंदना दिली .
या कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य डॉ. सुजित गुंजाळ,स्थानिक सल्लागार समिती उपाध्यक्ष कैलास सोनवणे, अनिल दरेकर, विंचूर ग्रामपालिका सरपंच सचिन दरेकर , उपसरपंच कुमार चव्हाण, माजी पंचायत समिती सदस्य संजय शेवाळे,दिलीप चव्हाण, मोमीन फिरोज, संतोष जाधव,सोमनाथ निकम, सतीश शेलार, किशोर दरेकर, शंकरराव दरेकर ,जरीना मोमीन, सोनाली कापडणीस, मीरा दरेकर, स्नेहल साळी, अनिता सोनवणे, शाहीन मोमीन, आरती जाधव, स्वाती धात्रक, सुनिता शिंदे,नानासाहेब गाडे, पी.के. जेऊघाले, डॉ. किशोर चौधरी, अरुण थोरे, डॉ. सालगुडे, अशोक दरेकर, पोमाराम देवासे,संकेत महाजन, प्रतीक राख, ज्ञानेश्वर सोनवणे, आत्माराम दरेकर, के. के. जेऊघाले,रामकृष्ण मवाळ, विनायक जेऊघाले, बाळासाहेब सोनवणे, सतीश सोनवणे, जनार्दन चव्हाण, बापूसाहेब सोदक, हरीश कांगणे, अण्णा कुमावत, सिकंदर बागवान, प्रवीण ढवण, निलेश दरेकर, रवींद्र सानप, एस. के. आहेर, सी. जी. बागुल, निवृत्ती गवळी, शांताराम दरेकर, गंगाधर जेऊघाले, प्रवीण चव्हाण, पत्रकार दत्तात्रय दरेकर जनार्दन चव्हाण व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर विंचूर गावातून विद्यार्थ्यांची फेरी काढण्यात आली. फेरीनंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे जनरल बॉडी सदस्य आर.के.चांदे व व्ही. सी.भोसले यांनी केले. कार्यक्रम यशस्वी पार पाडल्याबद्दल प्राचार्य एन.ई.देवढे, पर्यवेक्षक के.जी.जोपळे, प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक खैरनार सर, यांनी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व उपस्थित ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी, माजी विद्यार्थी व पत्रकार यांचे आभार मानले.

