Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

समर्थ वार्तापत्र

समर्थ वार्तापत्र

शिक्षकांच्या एक दिवसीय इंग्रजी प्रशिक्षण सत्रास ब्रिटिश कौन्सिल सल्लागारांची भेट

 

शरद लोहकरे लासलगाव 

   जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या इंग्रजी विषयाचा दर्जा सुधारण्यासाठी व विद्यार्थ्यांना कृतीयुक्त शिक्षणातून इंग्रजी विषयाची आवड निर्माण  होण्यासाठी दरमहा टॅग प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते. सदर प्रशिक्षणामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांच्या इंग्रजी  विषयांमध्ये गुणात्मक सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे. निफाड तालुक्यातील देवगाव, व खेडले झुंगे व गोंदेगाव या केंद्रामध्ये मध्ये सदर उपक्रम यशस्वी झालेला आहे. या  उपक्रमाची दखल घेत व त्याची यशस्वीता जाणून घेण्यासाठी तसेच इतर राज्यांमध्ये देखील सदर प्रकल्प राबवण्यासाठी सदर उपक्रम पथदर्शी प्रकल्प म्हणून निवड झालेली आहे त्या अनुषंगाने ब्रिटिश कौन्सिल सल्लागार श्री सौमेनदास चौधरी व सौ पूर्णिमा व ॶवस्थी यांच्या पथकाने सदर मीटिंग ला भेट देऊन सदर प्रकल्पाची पाहणी केली.

 मीटिंग साठी मार्गदर्शक म्हणून काम करणाऱ्या जि.प शाळा भवानीनगर शाळेतील शिक्षक श्री किरण भगवान शिंदे यांची याप्रसंगी मुलाखत घेत प्रकल्पाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेत सदर प्रकल्पाची नोंद घेतली. सदर  प्रशिक्षणासाठी विषय तज्ञ न्याहारकर सर देवगाव केंद्रप्रमुख श्री गावडे सर, खेडलेझुंगे केंद्रप्रमुख श्री गुजर सर व शाळांमधील 30 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी धारणगाव वीर शाळा  मुख्याध्यापक ललिता पवार मॅडम,थेटे मॅडम, गांगुर्डे सर,सालपुरे  सर, गंभीरे मॅडम , काळे सर व सोन्नर सर यांनी विशेष परिश्रम घेतले .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.