विंचूर/प्रतिनिधी -
ओमळी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी येथील नाभिक समाजाची कु. निलीमा सुधाकर चव्हाण ही अतिशय गरीब कुटुंबातील कन्या दापोली येथील भारतीय स्टेट बँकेत नोकरीस होती. शनिवार दि. 29 जुलै रोजी बँकेची सुटी झाल्यानंतर घरी येत असतांना ती अचानक बेपत्ता झाली. त्यानंतर तिचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत जवळच्या खाडीत मंगळवार दि.01 ऑगष्ट रोजी सापडलेला आहे.निलीमा चव्हाण हीच्या संशयास्पद मृत्युची पोलीस प्रशासनाने व महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने तातडीने सखोल चौकशी करून तपास लावावा. असे अमानुष व अमानवी कृत्य करणार्या आरोपींचा तपास होऊन त्यांना कठोर शासन करावे अशी मागणी महाराष्ट्र नाभिक महामंडळ महीला आघाडी, जिल्हा, तालुका समाज बांधवांचे वतीने निफाडचे तहसिलदार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तहसिलदारांनी नाभिक समाजाच्या भावना तातडीने वरीष्ठांपर्यंत पोहचवाव्यात असेही निवेदनात उल्लेख आहे.
यावेळी नाभिक महामंडळाचे शंकरराव वाघ, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष अनिल वाघ, श्रीकांत वाघ , विलास सूर्यवंशी, शशिकांत महाले, संदीप आहेर, अनिल सूर्यवंशी बाजीराव लोखंडे, दत्तात्रय, महिला तालुकाध्यक्षा मनीषा वाघ, अशोक जाधव, किशोर साळुंके मोहन जगताप, विष्णू कणसे, सुनील जाधव तुषार जगताप, प्रकाश वाघ, अभिजीत जगताप ,संदीप वाघ, अण्णासाहेब सोनवणे, प्रमोद सोनवणे, संतोष वाघ, दत्तात्रेय संत, मधुकर कणसे ,जयवंत मगर, योगेश जाधव, महेश निकम, सुरेश मगर, दीपक जाधव ,विशाल कणसे, शरद वाघ, दत्तात्रय शिंदे, संजय सोनवणे ,संतोष पंडित ,पूजा वाघ ,शितल मगर, मगर, मोहन जगताप ,वैशाली वाघ, अर्चना आहेर ,निशा कणसे ,भगवान सोनवणे, पत्रकार मच्छीद्र साळुंके तालुक्याती समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. निलिमा चव्हाणचा मृत्यु संशयास्पद -चिपळूण तालुक्यातील ओमळी येथील रहिवासी व दापोलीच्या स्टेट 24 वर्षीय तरुणी निलिमा चव्हाण हिचा मृतदेह तालुक्यातील दाभोळ खाडीकिनारी आढळून आला असून त्यामुळे तालुक्यासह चिपळूणमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, निलिमा हिचा मृत्यू हा आकस्मिक नसून घातपाताचा संशय कुटुंबियाबरोबरच ओमळी गावकर्यांनी व्यक्त केला आहे. दापोली स्टेट बँकेत कंत्राटी कर्मचारी निलिमा सुधाकर चव्हाण, (वय 24 रा. ओमळी, ता. चिपळूण) ही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या दापोली शाखेत सहा महिन्यापूर्वी कंत्राटी लिपिक पदावर रुजू झाली होती. गेल्या सहा महिन्यापासून करण्यात आली. दर महिन्याच्या दुसर्या व चौथ्या शनिवारी बँकेला सुट्टी असल्याने ती आपल्या ओमळी गावी जात असे. दि. 29 जुलैचा शनिवार हा महिन्याचा पाचवा शनिवार होता. मात्र, मोहरमची सुट्टी असल्याने शुक्रवारी रात्रीच निलिमाने आपला भाऊ अक्षय याला फोन करून आपण गावी येणार असल्याचे कळविले. निलिमा सकाळी दापोली राहात असलेल्या रुमवरून गावाकडे जाण्यास निघाली. दरवेळेच्या वेळेत निलिमा घरी न पोहोचल्याने ओमळी येथे असलेल्या घरच्यांना घोर लागला व त्यांनी फोनाफोनी केली. निलिमाच्या मैत्रिणीने ती सकाळीच दापोलीतून निघून गेल्याचे सांगितले. पण या वेळी निलिमाचा फोन लागत नसल्याने तिच्या कुटुंबियांची काळजी वाढली. अखेर हताश होऊन चिपळूण व दापोली पोलीस स्थानकात निलिमा ही बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल दापोली पोलीस ठाण्यात शनिवारी निलिमा ही बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर दापोली पोलिसांनी आपला तपास सुरू केला. मात्र दुसर्याच दिवशी रविवार असल्याने बँक बंद असल्याने तेथून माहिती, तसेच सीडीआर मिळणे कठीण बनले. दापोली एसटी स्टँडवरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती तरुणी खेडकडे जाणार्या बसमध्ये चढल्याचे दिसते.दि.1आँगष्ट रोजी त्या मुलीचे पूर्ण केस काढून चेहरा विद्रुप केल्या गेले. छिन्ह विच्छिन्न अवस्थेत त्या मुलीचा मृतदेह तालुक्यातील दाभोळ खाडीकिनारी आढळून आला आहे



