Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

समर्थ वार्तापत्र

समर्थ वार्तापत्र

अन्नदान केले शिर्डीला फळ मिळाले दिल्लीला

 ५० वर्षांपासून निराधारांची सेवा करणारे शिर्डीचे बाबा अय्यर दिल्ली येथे आदर्श समाजसेवक पुरस्काराने सन्मानित 

 इगतपुरी ( प्रतिनिधी )

अनेक जण फक्त स्वतःसाठी जगत असतात दुसऱ्यासाठी कुणीही जगताना दिसत नाही. आजच्या काळात माणुसकी लोप पावत चालली असतांना गोरगरिबांच्या सेवेतच खरा परमात्मा लपला असून माणसामध्ये शिर्डीच्या श्री साईनाथांचे असित्व समजून निराधारांच्या सेवेत वाहून घेतलेले माणुसकीचे दर्शन घडविणारे अन रक्तातच समाजसेवा असणारे शिर्डी येथील हॉटेल स्वामी मद्रासचे संचालक तथा समाजसेवक बाबा अय्यर यांचा आदर्श समाजापुढे नक्कीच प्रेरणादायी आहे. त्यांच्या समाजसेवेची दखल दिल्ली येथील ऑल इंडिया बिझनेस डेव्हलपमेंट असोसिएन आणि ग्लोबल सोसायटी एज्युकेशन ग्रोथ यांनी घेऊन त्यांना नुकतेच आदर्श समाजसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

बाबा अय्यर यांनी अन्नदान केले शिर्डीला अन फळ मिळाले दिल्लीला.

प्रमुख पाहुणे म्हणून हरीश रावल, डॉ राघव दास, डॉ. व्ही बी सोनी, के दास गुप्ता, डॉ जितेंद्र शेट्टी , सरदार चावला आदी मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानपूर्वक गौरविण्यात आल्याने त्यांच्यावर महाराष्ट्रभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. पुरस्कार स्वीकारतांना श्री साई सहाय्य समितीचे अध्यक्ष राजू देवळेकर, प्रेमा मनोज, पूर्णिमा सतीश, नवी दिल्ली सीमा सुरक्षा बलाचे प्रकाश आगोने आदी उपस्थित होते. निराधारांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा असल्याचे बाबा अय्यर यांनी सांगितले. शिर्डी येथील बाबा अय्यर हे गेल्या पन्नास वर्षांपासून दिनदुबळ्या लोकांची सेवा करण्याचे सामाजिक काम करीत आहे. निवारा बालगृह, लोक कलावंत, अनाथ निराधार, ऊसतोड मजूर, वीटभट्टी कामगार, आदिवासी भटके, विमुक्त वंचित व दुर्लक्षित घटकातील मुलांची देखभाल करून पालनपोषण करीत असतात. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन दिल्ली येथे त्यांना पुरस्कार सन्मानपूर्वक देण्यात आला. त्यांना त्यांच्या कामगिरीबाबत अनेक संस्थानकडून पुरस्कार देखील मिळाले आहेत. दिल्ली येथे पुरस्कार मिळाल्याबद्दल इगतपुरीच्या श्री साई समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ज्ञानदेव भागचंद गोणकर, प्रसाद अण्णा अय्यर, जहीर अली मंडल, प्रशांत चित्रे, दत्तात्रय धरम, किरण दुशिंग, उत्तम सोळसे, नाना रहाणे, गजेंद्र चव्हाण, सनी मोरे, अशोक नाना कराड, साईनाथ दिवेकर, वैभव ताटे, अकबर शेख, तन्मय विश्वास, कृष्णा रामकृष्ण, सतीश शिरसाठ, किरण बर्डे, अविनाश डांगे, प्रवीण भटाटे, निखिल कर्पे, दीपक पाणकर आदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.