Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

समर्थ वार्तापत्र

समर्थ वार्तापत्र

मंत्री छगन भुजबळ यांनी घेतली धानोरे येथील शहीद जवान श्रीराम गुजर यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

 

निफाड तालुक्यातील धानोरे येथील शहीद जवान श्रीराम राजेंद्र गुजर यांच्या निवासस्थानी राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री  ना. छगन भुजबळ यांनी कुटुंबाची सांत्वन भेट घेतली. 

यावेळी शहीद जवान श्रीराम गुजर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत श्रद्धांजली अर्पण करून गुजर कुटुंबांशी  संवाद साधला. यावेळी श्रीराम गुजर चे वडील राजेंद्र गुजर यांनी  ना.भुजबळ यांच्याशी संवाद साधताना मुलाची देश सेवेची इच्छा होती, निधनामुळे अपूर्ण राहिली तरी तो नक्कीच सर्व देशवासीयांच्या स्मरणार्थ शहीद मुलाचे स्मारक व्हावे अशी वडिलांनी भुजबळांकडे इच्छा व्यक्त केली.

यावेळी लासलगाव पो.निरीक्षक राहुल वाघ, मंडल अधिकारी संतोष डुंबरे , लासलगाव ग्रामपंचायतचे सरपंच जयदत्त होळकर, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळासाहेब शिरसागर, तलाठी शुभम पाटेकर, पो.का. सदिप निचळ, पोलीस पाटील अरूण गुजर, ग्रामसेवक चंद्रकांत बोरसे ,यांच्यासह ,आदी मान्यवर उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.