विंचूर ग्रामपालिकेचे माजी सरपंच जनार्दन पांडूरंग गोरे यांच्या पत्नी व प्रगतशील शेतकरी अरुण गोरे व संतोष गोरे यांच्या मातोश्री सिंधुबाई जनार्दन गोरे यांचे नुकतेच निधन झाले. शोकाकुल गोरे कुटुंबीयांचे राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना.छगन भुजबळ यांनी भेट घेऊन सांत्वन केले.याप्रसंगी गोरे कुटुंबातील अरुण गोरे,संतोष गोरे,लता सोमवंशी, बेबी फल्ले, गंगाधर गोरे, सुधाकर गोरे, रमेश गोरे, विलास गोरे, उद्धव गोरे, कैलास गोरे, संजय गोरे, सुनिल गोरे, राजेंद्र गोरे, अमोल रहातेकर,शुभम गोरे, राहुल गोरे, साहिल गोरे, समिक्षा गोरे,यांची भेट घेऊन सांत्वन केले.यावेळी ना.भुजबळ यांच्या समवेत लासलगाव बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, लासलगावचे सरपंच जयदत्त होळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे येवला लासलगाव विधानसभा अध्यक्ष वसंत पवार,ना.भुजबळांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे, पांडूरंग राऊत आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


.jpeg)