Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

समर्थ वार्तापत्र

समर्थ वार्तापत्र

विंचूर विद्यालयात गुरुकुल पालक-शिक्षक मेळावा संपन्न

 
विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयामध्ये रयत गुरुकुल प्रकल्प अंतर्गत पालक-शिक्षक संघाची सभा नुकतीच संपन्न झाली. प्रथम विद्यालयाचे उपशिक्षक व्ही.सी.भोसले यांनी अध्यक्ष निवडीची सूचना मांडली. त्यास उपशिक्षक पी.ए.सरोदे यांनी सर्वानुमते अनुमोदन दिले. उपस्थित मान्यवरांनी कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर विद्यालयाचे गुरुकुल प्रमुख एम.एस. निकम यांनी आपल्या प्रास्ताविकात गुरुकुल प्रकल्पाचा 25 कलमी कार्यक्रम तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश, पालक-शिक्षक संघाची कार्यपद्धती, विद्यार्थी शिस्त याबद्दल मार्गदर्शन केले. 

या सभेत गुरुकुल प्रकल्प पालक शिक्षक संघाची कार्यकारीणी निवडण्यात आली. पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष- किशोर दरेकर, सचिव-एम.एस.निकम सहसचिव- अमिता सोनवणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यानंतर स्पर्धा परीक्षा प्रमुख यु.ए.सारूक्ते, जे.बी.सोनवणे, ए.ए.पवार, ए.एच.पाटील, ए.एम.पवार, एस.पी.गाडेकर यांनी स्पर्धा परीक्षेसंबंधी मार्गदर्शन केले. त्यानंतर सहविचार सभेचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य एन.ई.देवढे यांनी विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत पालकांची भूमिका व जबाबदारी महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन आपल्या मनोगतातून केले व पालकांच्या समस्यांचे निराकरण केले. 

या सभेसाठी स्थानिक सल्लागार समिती सदस्य पंढरीनाथ दरेकर, तसेच सोमनाथ निकम, पंढरीनाथ जेऊघाले, सतीश शेलार, गंगाधर गोरे, ज्ञानेश्वर गाडे, पत्रकार दीपक घायाळ, दत्तात्रय दरेकर, किशोर जेऊघाले, राजेंद्र गोरे, मालती जाधव, स्नेहल साळी विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , तसेच मोठ्या प्रमाणात पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संस्थेचे लाईफ मेंबर राजेंद्र चांदे यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.