स्वराज्य संघटनेने बसस्टॅन्ड मध्ये केली भाताची लावणी:
सुनिल बोडके पाटील, वेळुंजे (त्र्यंबकेश्वर)..
त्र्यंबकेश्वर हे महत्वाचे समजले जाणारे आद्य जोतिर्लिंग असून याठिकाणी लाखो भाविकांची वर्दळ असते,मात्र येथील बस स्टॅन्डची दशा बघितली तर कसलीच सोय मिळत नसल्यामुळे इथे येणारा भाविक सुविधेच्या बाबतीत नाक तोंड मुरडताना दिसत असून येथील बस स्टॅन्डच्या बाबतीत कमालीची नाराजी दिसून येत आहे,येथे घाणीचे सामराज्य मोठ्या प्रमाणात झाले असल्यामुळे प्रवाश्याना नाहक त्रास सहन करावा लागत आहे,प्रामुख्याने बस स्टॅन्डचे आवार पूर्ण चिखलाणे पाण्याने भरले असून याठिकाणी चालता तर येत नाहीच परंतु उभे राहणे देखील अवघड झाले आहे,तसेच याठिकाणी सुलभ स्वच्छता गृहाची अवस्था खुप बिकट असून याचा वापर कुणी करताना दिसत नसून उघड्यावरच कुठे तरी अडोसा शोधावा लागत आहे, खेड्यावातील शालेय विध्यार्थी, विध्यार्थिनी यांना देखील अतोनात त्रास सहन करावा लागत आहे, बस स्टॅन्ड विभाग मात्र याकडे सरळ काना डोळा करताना दिसत आहे,
येत्या काही दिवसात श्रावण मास सुरु होत असून यावेळी बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या खुप जास्त आहे,प्रत्येक्षात इथे कसलीही उपाय योजना दिसून येत नाहीय त्यामुळे अश्या अवस्थेतील बस स्टॅन्ड असेल तर भाविकांना खुप मनस्थाप सहन करावा लागणार असून,यामुळे अबाल वृध्द भाविकांची हेळ सांड होऊ शकते,आताच इतका चिखल झालेला असल्यामुळे साधं चालनही मुशकील आहे त्यामुळे परिवहन विभाग प्रशासन करतय तरी काय असा प्रश्न येथील प्रवाशी यांना पडला आहे,
याबाबतीत येत असलेल्या समस्याबद्दल त्र्यंबकेश्वर स्वराज्य संघटनेने पुढाकार घेऊन महाराष्ट्र भर खड्डे बुजवा अपघात वाचावा स्वराज्य आंदोलन केले जात असताना, या अनुषंगाने त्र्यंबकेश्वर येथे देखील बस स्टॅन्ड च्या सुविधे बाबतीत तसेच बस स्टॅंडच्या आवरत पडलेच्या खड्डयाच्या बाबतीत येथील पदाधिकारी यांनी स्वराज्य पक्षाचे संपर्क प्रमुख करण गायकर यांच्या आदेशाने तसेच नाशिक जिल्हा प्रमुख डॉ रुपेश नाठे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले, यावेळी बस स्टॅन्ड च्या आवरात भाताचे रोप लावण्यात आले, यामुळे तरी संबंधित विभागाचे लक्ष लागून काहीतरी उपाय योजना करण्यात येतील, बस स्टॅंडच्या अडचणी बाबतीत येथील अगार व्यवस्थापकाकडे निवेदन देण्यात आली असून या निवेदनात या आवाराची झालेली दुर्दशा लवकरात लवकर सुधरावी तसेच प्रवश्याची होत असलेली गैरसोय थांबवावी, आवश्यक त्या सुविधा पुरवण्यात याव्या,खेड्यातून शालेय विध्यार्थी मोठ्या प्रमाणात येत असतात मात्र बस स्टॅन्ड वर बस थांबवत नाही त्यामुळे विध्यार्थी यांना घरीच थांबावे लागत आहे, त्यामुळे संबंधित बस चालकांना योग्य त्या सूचना देण्यात याव्या,स्वछ्यालयाची सोय करण्यात यावी,अन्यथा येत्या काही दिवसात स्वराज्य संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल याची परिवहन विभागाने नोंद घ्यावी असेही स्वराज्य सांगतानेच्या पदाधिकारी यांनी सांगितले,यावेळी स्वराज्य संघटना तालुका प्रमुख संतोष मिंदे,महिला तालुका प्रमुख राणी लोखंडे, युवा तालुका प्रमुख सागर खांदवे, उप तालुका प्रमुख विलास बोडके, उप युवा तालुका प्रमुख शिवाजी आहेर,महिला उप तालुका प्रमुख पूनम मेढे,आरोग्य तालुका प्रमुख नितीन सकाळे,शेतकरी तालुका प्रमुख शरद चव्हाण, सरचिटणीस रवी खांडबहाले,इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते,

