न्याय न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार : कृष्णा गभाले
इगतपुरी ( प्रतिनिधी )इगतपुरी तालुक्यातील खैरगाव देवळे रस्त्याची पूर्णपणे वाट लागली असून अनेक दिवसांपासून दुरुस्ती होत नाही. जनतेला आश्वासनांची खिरापत वाटणाऱ्या लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून देवळे ते खैरगाव रस्ता तात्काळ दुरुस्त करावा यासाठी स्वराज्य पक्षाच्या वतीने खड्डे बुजवा, अपघात वाचवा अशी घोषणाबाजी करून आंदोलन करण्यात आले.
रस्त्याबाबत प्रशासन उदासीन असून तातडीने न्याय मिळाल्यास प्रदेशाध्यक्ष करण गायकर, जिल्हाप्रमुख डॉ. रुपेश नाठे, उप जिल्हाप्रमुख डॉ. महेंद्र शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्य पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा तालुका संघटक कृष्णा गभाले यांनी दिला आहे.
शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष नारायण जाधव, तालुकाध्यक्ष नारायण राजे भोसले, उपतालुकाप्रमुख सखाराम गव्हाणे, विध्यार्थी सेना तालुका प्रमूख ऋतिक जाधव, सहकार आघाडी हरीश अण्णा कुंदे, युवा तालुकाध्यक्ष गोकुळ धोंगडे, उमेश सुरुडे, कैलास गव्हाणे, बाळू सुरूडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असे तालुका संघटक कृष्णा गभाले यांनी सांगितले.
यावेळी तालुका संपर्कप्रमुख शिवाजी गायकर, खैरगाव शाखाप्रमुख गौरव गभाले,खजिनदार श्रीराम गभाले, प्रशांत गभाले, प्रकाश शेठ सिंघवी, किरण गायकवाड, प्रवीण गभाले, योगेश गभाले, सरपंच मारुती आघान, उपसरपंच गणेश गायकर, ग्रामसेविका सुवर्णा आहेर, आनंदा मुठे, सौरभ गभाले, महेश परदेसी, रामदास जाखेरे आदी स्वराज्य पदाधिकारी व खैरगाव ग्रामस्थ उपस्थित होते.

