दोघांना अटक
विंचूर
येथील लासलगाव रोड वरील स्मशान भूमितील प्रेत जळण्याच्या ओट्या लगतचे लोखंडी अँगल सुमारे साडेसात हजार रुपये किमतीचे चोरट्यांनी चोरून नेल्याची फिर्याद मिलिंद वाघ यांनी पोलीसांना दिली. यावरून विंचूर पोलिसांनी शोध घेतला असता
सदरच्या गुन्ह्यात 2 संशयितांना अटक करण्यात आलेली आहे.
1- शाकीर बशीर तांबोळी, रा. नंदन वन नगर पिंपळगाव नाजिक
2- संतोष वामन कुऱ्हाडे, रा. राजवाडा लासलगाव अशी त्यांची नावे असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार घुमरे व पोलीस नाईक बिडगर करीत आहेत.

.jpeg)