
सध्याच्या परिस्थितीत भारतातीलच नाही तर संपूर्ण जगातील हवामानात दिवसेंदिवस आमुलाग्र बदल होत आहे व याचा परिणाम पर्यावरणावर होवून पृथ्वीतलावरील संपूर्ण जीवसृष्टीवर विपरीत परिणाम होत आहे.अशा परिस्थितीत जर आपण विदेशातून कोणतेही प्राणी आणले तर त्याला सर्वप्रथम हवामानाशी सामना करावा लागतो.यानंतर जंगलातील वेगवेगळ्या प्राण्यांशी झुंज द्यावी लागते.कारण आपण जे चित्ते आणलेत ते दक्षिण आफ्रिका व नामिबियातून आणलेले आहेत.म्हणजेच सात समुद्रापार करून चित्ते भारतात आणले.त्यामुळे या चित्त्याना हवामानाच्या धोका अवश्य राहु शकतो सोबतच भारतातील वन्यप्राण्यांचा सुध्दा चित्त्याना धोका असु शकतो याला नाकारता येत नाही.देशात जंगलात चित्त्यांपेक्षा अनेक हिंसक प्राणी आहेत.त्याचप्रमाणे देशातील जंगलात विविध प्राणी आहेत व प्रत्येक प्राणी आपापल्या पद्धतीने प्रत्येक प्राण्यांना चांगल्याप्रकारे ओळखतो व त्याच पद्धतीने आपापली बचावात्मक भुमिका व शिकारीची भुमिका प्रत्येक प्राणी चांगल्याप्रकारे जाणतो.अशा परिस्थितीत माझ्या मते विदेशी पाहूण्यांचा(चित्त्यांचा) टिकाव लागणे शक्यच नाही असे मला वाटते.या संपूर्ण परिस्थितीमुळे म्हणजेच हवामान किंवा भारतातील वन्यप्राण्याच्या आक्रमकतेमुळे आतापर्यंत 8 चित्त्यांचे प्राण गेले असावेत याला सुध्दा नाकारता येत नाही.केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी चित्ता प्रकल्पा अंतर्गत नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून 20 चित्ते भारतात आणून त्यांना मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात ठेवण्यात आले. परंतु आतापर्यंत 8 चित्त्यांचा मृत्यू झाल्याने उरलेल्या 12 चित्त्यांचा जिवाला सुध्दा धोका होऊ शकतो याला नाकारता येत नाही.असेही होवू शकते की कुनोच्या राष्ट्रीय उद्यानात चित्त्यांसाठी जागा अपुरी पडत असावी किंवा त्यांना पाहिजे त्या पध्दतीची शिकार उपलब्ध होत नसावी त्यामुळे सुध्दा त्यांचा मृत्यू होवू शकतो.आता चित्त्यांच्या मृत्यूचा विषय सर्वोच्च न्यायालयात गेलेला आहे.त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्राची कानउघाडणी करून प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत.त्याचप्रमाने सर्वोच्च न्यायालय म्हणतो की हवामान अनुकूल नाही की आणखी काही अन्य कारणे आहेत? कारण 20 चित्त्यांपैकी आठ दगावले आहेत. गेल्या आठवड्यात दोन चित्त्यांचा मृत्यू झाला.तुम्ही त्यांना अन्य अभयारण्यामध्ये हलविण्याच्या शक्यतेचा शोध का घेत नाही? तुम्ही त्याला प्रतिष्ठेचा मुद्दा का बनवत आहात?असे अनेक प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला केले आहे.भारतातील चित्ते नामशेष झाले हीबाब सत्य आहे.त्याचप्रमाणे देशातील अनेक प्रजातींचे पशु-पक्षी सुध्दा नामशेष झाले आहेत.काही पशुपक्षी शिकाऱ्यांना बळी पडले तर काही बदलत्या हवामानामुळे नामशेष झालेत.हीच परिस्थिती देशातील वृक्षांची सुध्दा आहे.देशातील जंगल तोडीमुळे अनेक औषधीपयोगी वनस्पतींचे वृक्ष नामशेष झाले आहेत.हा सर्व प्रकार वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण,वाढती लोकसंख्या व बदलत्या हवामानामुळे संपूर्ण निसर्गाचेच संतुलन बिघडले आहे.त्यामुळे पर्यावरणावर विपरीत परिणाम होवून संपूर्ण जीवसृष्टीवर याचा गंभीर परिणाम होतांना आपण पहातो.वृक्षतोडीमुळे देशासह जगातील जंगलसंपदा हळूहळू कमी होत असल्याने जंगलातील प्राण्यांचे जगने अत्यंत कठीण झाले आहे.अशा परिस्थितीत बाकी राहिलेले विदेशी पाहूणे (चित्ते) कसे काय जगतील याची शंकाच आहे.त्यामुळे सरकारने बाकी असलेल्या चित्त्यांची जातीने काळजी घ्यावी हीच अपेक्षा!
लेखक
रमेश कृष्णराव लांजेवार
(माजी विद्यापीठ प्रतिनिधी नागपूर)
मो.नं.9921690779, नागपूर.

