Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

समर्थ वार्तापत्र

समर्थ वार्तापत्र

शिक्षण महोत्सव E-20 मध्ये सुरगाण्याच्या दोन उपक्रमांची निवड

 


लक्ष्मण पवार, हतगड :- 

भारताला G-20 चे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे,त्यामुळे भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्व वाढले आहे. त्याच धर्तीवर शिक्षण क्षेत्रात नाशिक जिल्ह्याचा ठसा उमटावा या हेतूने Education -20 म्हणजेच E-20 हि संकल्पना उदयास आली आहे. त्या संकल्पनेतून नाशिक जिल्हा परिषद CEO आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली जि.प. नाशिक शिक्षणाधिकारी भगवानफुलारी  , सर्व १५ तालुक्यातील BEO सर्व जिल्ह्यातील विस्तार अधिकारी,व सर्व केंद्रप्रमुख यांच्या उपस्थितीत मा.दामिनी माईनकर मुख्य कार्यकारी अधिकारी LFE यांनी  नुकतीच नाशिक जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांच्या व अधिकाऱ्यांच्या उपक्रमांना व्यासपीठ LEP Team नाशिक व जिल्हा परिषद नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानाने नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर अंबड येथे उपलब्ध करून देण्यात आले
जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षक अधिकारी व अंगणवाडी कर्मचारी यांच्याकडून आपले उपक्रम सादर करण्यासाठी लिंकद्वारे माहिती मागवण्यात आलेली होती. या लिंकवर २०० च्या वर प्रतिसाद प्राप्त झाले होते त्यापैकी 20 शिक्षक, अधिकारी व अंगणवाडी कर्मचारी यांच्या उपक्रमांची निवड LFE व नाशिक जि.प.कडून करण्यात आलेली होती.
नाशिक जि. प.CEO आशिमा मित्तल,शिक्षणाधिकारी फुलारी,  सर्व तालुक्यातील BEO,  जिल्ह्यातील सर्व विस्तार अधिकारो व सर्व केंद्रप्रमुख यांनी प्रत्येक स्टॉलला भेट दिली.
डिजिटल शिक्षण हि काळाची गरज आहे. त्यात आपण सर्व प्रभावशाली काम करत आहात संपूर्ण नाशिक जिल्ह्यासाठी तुमचे उपक्रम राबविणार असल्याबाबत नियोजन करू असे मत नाशिक जि.प.चे CEO आशिमा मित्तल, यांनी भेटी प्रसंगी व्यक्त केले.व मा. अशिमा मित्तल यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. त्याप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी सुरगाणा भाऊसाहेब सरक ,मुख्य कार्यकारी अधिकारी LFE दामिनी माईंनकर,प्रमिला शेंडगे ,प्रमोद चिंचोले ,चित्रा देवरे
मनपा नाशिक ,कुंदा बच्छाव ,  नाशिक जि.प.सभेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० प्रभावी अंबलबजावणी व पर्यवेक्षीय यंत्रणेची भूमिका आणि जबाबदारी या विषयावर सचिन जोशी सरांनी मार्गदर्शन केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.