हनुमान जन्मोत्सव व अखंड हरिनाम सप्ताहास भक्तिमय वातावरणात प्रारंभ
रामभाऊ आवारे, निफाड...
श्रीक्षेत्र ॐ चैतन्य कानिफनाथ आश्रम सोनेवाडी बुद्रुक तालुका निफाड येथे 108 कुंडात्मक श्री शिव पंचायतन महारुद्र स्वाहाकार यज्ञ व हनुमान जन्मोत्सव व अखंड हरिनाम सप्ताह रविवार २ एप्रिल पासून भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला असल्याची माहिती कार्यक्रमाचे आयोजक तथा ओम चैतन्य कानिफनाथ आश्रमाचे मुख्य अनुयायी श्री महंत दिगंबरगिरीजी महाराज (आण्णा बाबा) यांनी दिली आहे.
कार्यक्रमाची रुपरेषा याप्रमाणे
रविवार ०२ एप्रिल रोजी स.०९ ते १२: शांतीसुक्त वेद पठण, प्रधान संपल्य, गणेश पुजनादि, पंचागविधी, सदगुरु पादुका, पूजन, ऋत्विक वर्णम, मंडप प्रवेश, दु.०३ ते ०६ वास्तु पुजन प्रधान देवता स्थापना, अग्निमंथन, नवग्रह मंडल स्थापना ग्रह हवन सायं पुजन आरती मंत्र पुष्पांजली, सायं ०६ ते ०९ हरिपाठ व महाप्रसाद रात्री ०९ ते ११ : श्री.ह.भ.प. गणपत महाराज लगड ( सोनेवाडी बु.।।) यांचे हरिकिर्तन, सोमवार ०३ एप्रिल रोजी स.०९ ते १२ : शांतीसुक्त वेद पठण, स्थापित देवता पुजन, रुद्र स्वाहाकार दु.०३ से ०६ शिवपंचायतन याग, प्रधान हवन, सायंम पुजन, आरती, मंत्र पुष्पांजली सायं ०७ ते ०९: हरिपाठ व महाप्रसाद रात्री ०९ ते ११ श्री.ह.भ.प. नंदकिशोर महाराज पवार (आहेरगांव) यांचे हरिकिर्तन, मंगळवार ०४ एप्रिल रोजी स.०९ ते १२ शांतीसुक्त वेद पठण, स्थापित देवता पुजन, प्रधान हवन कुंकुमार्चन / बिल्वार्चन दु.०३ ते ०६ शिवपंचायतन याग, प्रधान हवन, सायंम पुजन, आरती, मंत्रपुष्पांजली, सायं ०७ ते ०९ हरिपाठ व महाप्रसाद, रात्री ०९ ते ११ श्री.ह.भ.प. प्रशांत महाराज रायते (खडकमाळेगांव) यांचे हरिकिर्तन, बुधवार ५ एप्रिल रोजी स.०९ ते १२ : शांतीसुक्त वेद पठण, स्थापित देवता पुजन प्रधान हवन दु.०३ ते ०६ शिवपंचायतन याग, प्रधान हवन, सायंम पुजन, आरती, मंत्र पुष्पांजली, सायं ०७ ते ०९: हरिपाठ व महाप्रसाद, रात्री ०९ ते ११ श्री.ह.भ.प. सौरभ महाराज जाधव (कुंडाणे) यांचे हरिकिर्तन, गुरुवार ६ एप्रिल रोजी
स.०७ ते १० : शांतीसुक्त वेद पठण, स्थापित देवता पुजन, प्रधान हवन, उत्तरांगहवन, महाबली पुजा, कालिकापूजन, भैरव पुजन, शिवपंचायतन महायागाची पुर्णाहुती, श्री हनुमान जन्मोत्सव व चैतन्य कानिफनाथ महाराज अभिषेक व महापुजा व नाथांची पालखी मिरवणुक (ग्रामप्रदक्षणा) सकाळी १० ते १२ : श्री.ह.भ.प. भागवत महाराज शिंदे (जि.बिड) यांचे काल्याचे किर्तन व दुपारी १२ ते ०२ महाप्रसाद होणार आहे तरी सोनेवाडी सह पंचक्रोशीतील भाविकांनी या ज्ञानामृताचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आव्हान कार्यक्रमाचे आयोजक श्रीमहंत दिगंबरगिरीजी महाराज (आण्णा बाबा),ॐ नव चैतन्य कानिफनाथ महाराज आश्रम, सोनेवाडी बु. ॥ समस्त ग्रामस्थ, पंचक्रोशितील सर्व साधकसमुह व भजनी मंडळ परिवार यांनी केले आहे.
भाविकांसाठी सुचना - १) पारायणास व होमासाठी बसणाऱ्या सर्वांची भोजन व निवासासाठी व्यवस्था समिती मार्फत करण्यात आलेली आहे. २) येण्यान्या भाविकांनी आपल्या सोबत ग्रंथ, अंथरून पांगरून, तांब्या, बॅटरी, नित्याचे कपडे, गोळ्या ओषधे इ. सोबत आणावे.स्थळ : ॐ नव चैतन्य कानिफनाथ महाराज आश्रम, जि. प. शाळेजवळ, सोनेवाडी बु.।।, ता. निफाड, जि. नाशिक.

