रामभाऊ आवारे, निफाड
दरवर्षी महिलांचा सन्मान व्हावा ,त्यांच्या कार्यकर्तुत्वाचा आढावा जनतेसमोर यावा, महिलांना त्यांचे अधिकार व कर्तव्य याची जाणीव व्हावी व त्या करत असलेल्या आपल्या क्षेत्रातील कार्याबद्दल सन्मान व्हावा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सिन्नर शहरात प्रथमच नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम व आशात्मजा फाउंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन
सिन्नर येथील रामकमल लॉन्स येथे महिलांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले असल्याची माहिती कार्यक्रमाच्या आयोजक कवयित्री सौ सुनीताताई वाळुंज सिन्नर यांनी दिली आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शितल ताई सांगळे, देवरे साहेब फोरम डायरेक्टर प्रमुख पाहुणे डॉ, प्रतिभा गारे,डॉ स्मिता थोरात ,मधुबाला कटारिया, गायत्री वर्पे, चित्रा लोंढे, शितल कानडी,वसुंधरा तिडके,प्रीती वायचळे,उषाताई नवले, रुपाली निंबाळकर, सारिका शिंदे, तेजस्विनी वाजे आदी होते.
कार्यक्रमाचे आयोजक विविध पुरस्कार प्राप्त कवयत्री सौ सुनिता वाळुंज व सिलिब्रेटी मलेशिया क्विन नूतन मिस्त्री या होत्या.यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ५० महिला भगिनींना उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ तसेच पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
*पुरस्कारार्थी महिला याप्रमाणे --*
छाया शिंगोटे, अनिता गांडोळे, कल्पना गुंजाळ, अनिता बागड, लता शिंदे, जयश्री विघे, नेहा शिंदे, स्नेहल झळके, सीमा क्षत्रिय, ज्योती डागा, रुपाली मुठाळ,स्वाती लामखेडे, डॉ, माधवी पवार, ज्योती शिंदे, पल्लवी गडाख, रेणुका वंजारी, मीरा सोनवणे, कामिनी सोनवणे, वैशाली निमबालकर, शालन दळवी, कविता पाटील, रंजना ढोली, भावना गुजराथी, कल्याणी गुजराथी, आरती गुजराथी,
नलिनी क्षत्रिय, रोहिणी थोरात, सरोजिनी कालमेघ, इंदिरा मुदबखे, सरला गवळी, संध्या गवळी, पायल हंबरे, कांचन गवळी, रेणुका काळे, धनश्री काळे, देवयानी वाघ, स्नेहल काळे, ज्योती गायकवाड, मेघा दराडे, सोनल भाटजीरे जयश्री कोकाटे, लता मुदबखे, नलिनी गाडे,
आदी महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दर्पणा मिश्री यांनी केले.
गायिका नूतन यांनी सुरेल जुनी गाणी सादर करून महिलांची करमणूक केली आयोजक सुनीता वाळुंज यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

