काँग्रेस नेते, कृषीतज्ञ, सचिन होळकर यांची केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्याकडे मागणी
शरद लोहकरे, लासलगाव...
कांदा पिकाला मिळत असलेले बाजारभाव हे अत्यंत कमी असल्याने राज्य सरकारने 350 रुपये प्रति क्विंटल इतके अनुदान जाहीर केले मात्र अनुदान प्राप्त करून घेण्यासाठी कांदा विकल्याची पावती सोबत सातबारा उताऱ्यावरील कांदा पिकाची नोंद असणे सक्तीचे केले आहे. मात्र पीक पेरा किंवा पिकाची नोंदणी करण्यासाठी सरकारने ई पिक पाहणी नावाचे ॲप्स बनवले आहे पूर्वी तलाठ्याकडे होणारी नोंद आता होत नाही. अनेक शेतकऱ्यांकडे साधे मोबाईल असल्याने तसेच नेटवर्कची समस्या असल्याने, अनेकांच्या शेतावर रेंज मिळत नसल्याने हजारो शेतकरी पीक नोंदी पासून वंचित राहिले आहे आता अनुदानासाठी मात्र त्यांना नोंद सक्तीची करण्यात आली आहे त्यामुळे सरकारने जाहीर केलेले अनुदान त्यांना मिळत नाही. याबाबतची समस्या जाणून घेत नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस, कृषीतज्ञ सचिन आत्माराम होळकर यांनी केंद्रीय मंत्री डॉ भारती पवार यांच्याशी दूरध्वनीवरून थेट संपर्क करून त्यांना याबाबतची माहिती दिली. त्यासोबतच सातबारावरील नोंदी ऐवजी शेतकऱ्यांकडून कांदा पीक लावल्याबद्दलचे स्वयंघोषणापत्र घेण्यात यावे आणि शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान द्यावे अशी विनंती त्यांनी केली. याबाबतचा पाठपुरावा पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे देखील केलेला आहे शेतकऱ्यांना अनुदान मिळेपर्यंत या विषयाचा पाठपुरावा करण्यात येईल असे काँग्रेस नेते, कृषीतज्ञ सचिन होळकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

.jpeg)