शरद लोहकरे,लासलगाव.....शिक्षणाच्या प्रवाहात आधुनिकतेनुसार अनेक स्वरूपाचे बदल होताना दिसतात. त्याचबरोबर नवीन शैक्षणिक धोरण आणि विविध प्रवाह, तंत्रज्ञानामध्ये होणारा बदल या सगळ्या गोष्टींचा विचार करता आज कालच्या विद्यार्थ्यांनी आधुनिकतेची आणि विज्ञानाची कास धरणे अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिपादन सागर क्लासेस आणि गुरुकुल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या विद्यार्थ्यांच्या सदिच्छा समारोह प्रसंगी मविप्रचे सभापती तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी प्रतिपादन केले.
याप्रसंगी व्यासपीठावर निफाडचे उपनगराध्यक्ष अनिल पाटील कुंदे, प्रमुख वक्ते,साहित्यिक,कवी किशोर गोसावी, माजी नगरसेवक देवदत्त कापसे,युवा नेते विक्रम रंधवे, भाजपाचे जिल्हा चिटणीस संजय गाजरे, श्री माणकेश्वर वाचनालयाचे सहचिटणीस राहुल दवते, गुरुकुल फाउंडेशन चे सर्वेसर्वा प्रा.युवराज कराड, इंद्रजीत कायस्थ,सागर क्लासेसचे प्रा.सागर सानप,प्रा. बाळासाहेब भाबड, प्रा. महेश बनकर, प्रा.समाधान पानगव्हाणे, प्रा. भाऊसाहेब सानप, प्रा. साप्ते, प्रा.अमोल साळुंके आदींसह मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांना रोप, शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी उपनगराध्यक्ष अनिल कुंदे यांनी शिक्षणाचे बाजारीकरण तसेच शिक्षणाच्या प्रवाहात होणाऱ्या नाविन्यपूर्ण बदलाबाबत मनोगत व्यक्त केले. युवा नेते विक्रम रंधवे यांनी विद्यार्थ्यांनी नवनवीन शिक्षण प्रवाहातले बदल स्वीकारावे आणि स्वतःला सक्षम आणि स्वावलंबी बनावे असे मनोगतातून विद्यार्थ्यांना सांगितले.
गुरुकुल फाउंडेशनचे प्रा.युवराज कराड, प्रा.बाळासाहेब भाबड,इंद्रजीत कायस्थ यांनी सायन्सचे महत्व विशद करून इयत्ता दहावी व बारावीनंतर असणाऱ्या विविध स्वरूपाच्या संधी तसेच स्पर्धा परीक्षा,एंट्रन्स परीक्षा, जेईई, नीट, सीईटी यांसह शिक्षणाचे होत असणारे बाजारीकरण, फसव्या जाहिराती तसेच आयुष्यात यश आणि ध्येय गाठण्याचे विविध मार्ग, पर्याय यांबाबत पालक व विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.
याप्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा महेश बनकर यांनी केले तर आभार प्रा सागर सानप यांनी मानले.

