Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

समर्थ वार्तापत्र

समर्थ वार्तापत्र

*कृषी क्षेत्रातील जीवनगौरव पुरस्कारासाठी निवृत्ती दामोदर निकम माळी व शिवाजी दादा बस्ते यांची निवड-*-


रामभाऊ आवारे, निफाड...

महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असलेल्या सलादे बाबा कला कला मंडळ या बहुद्देशीय ट्रस्ट तर्फे कृषी क्षेत्रासाठी देण्यात येणाऱ्या जीवनगौरव पुरस्कारासाठी कादवा सहकारी साखर कारखान्याचे व्हा चेअरमन शिवाजी दादा बस्ते वडनेर भैरव येथील महात्मा फुले पाणी वापर संस्थेचे संस्थापक चेअरमन निवृत्ती दामोदर निकम माळी यांची निवड करण्यात आल्याची माहिती ट्रस्टचे सचिव श्री राहुल भिकाजी पाचोरकर यांनी दिली.

सलादे बाबा कला क्रीडा मंडळ ट्रस्ट नाशिक व सलादे बाबा कंपनी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानाने कृषी क्षेत्रासाठी विशेष योगदान देणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी बळीराजा कृषी सन्मान दरवर्षी आयोजित करण्यात येत असतात यावर्षी आयोजकांच्या वतीने देण्यात येणारा कृषी क्षेत्रातील जीवनगौरव पुरस्कार धोंडगव्हाणवाडी येथील प्रगतिशील शेतकरी व कादवा सहकारी साखर कारखान्याचे व्हा चेअरमन शिवाजी दादा बस्ते आणि वडनेर भैरव येथील प्रगतिशील शेतकरी व निवृत्ती दामोदर निकम (माळी) यांची निवड करण्यात आली आहे. लवकरच या दोन्ही मान्यवरांना विशेष कार्यक्रमात मान्यवर व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये सन्मानित करण्यात येईल. शिवाजी दादा बस्ते यांनी एकत्रित कुटुंबात शेती या विषयाशी निगडित नेत्रदीपक काम केले असून त्यांच्या या कार्याचा आदर्श नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी घेतलेला आहे. त्यांच्या शेतकरी व शेती या विषयाचा सन्मान म्हणून व त्यांनी आतापर्यंत कृषी क्षेत्रात केलेल्या कार्याचे योगदान म्हणून त्यांना कृषी क्षेत्रातील अशासकीय जीवनगौरव पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला.वडनेर भैरव येथील प्रगतशील शेतकरी निवृत्ती दामोदर माळी म्हणजेच एन डी माळी यांनी वडनेर भैरव परिसरामध्ये आणि नाशिक जिल्ह्यात शेती करताना युवकांना विशेष मार्गदर्शन व पाणी बचतीचे महत्त्व या विषयावर काम केलेले आहे. नाशिक जिल्ह्यातील अनेक लोक शेतकऱ्यांना शेती बाबत जनजागृती करून नोकरी ऐवजी शेती व शेती प्रक्रिया उद्योगाकडे युवकांनी वळावे यासाठी काम करणारे श्री एन डी माळी यांना सन 2023 चा कृषी क्षेत्रातील जीवनगौरव पुरस्कार देण्याचा निर्णय सलादे बाबा कला क्रीडा मंडळ ट्रस्ट नाशिक यांच्यावतीने नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या निवड समितीत मनोहर नाना पाटोळे , रामचंद्र आप्पा मोरे, दत्तात्रय शिंदे, गौतम बापू पाटील, रामनाथ जगताप, सुरेश सलादे यांचा समावेश होता या सर्वांनी या दोन्ही शेतकऱ्यांचे शेतीमधील योगदान बघता ज्येष्ठ शेतकरी म्हणून कृषी क्षेत्रातील जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्याची शिफारस केली त्याप्रमाणे लवकरच विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये श्री बस्ते व श्री निकम या दोन्ही शेतकऱ्यांना सहपत्नीक गौरविण्यात येणार आहे. जीवन गौरव कार्यक्रमातच नाशिक जिल्ह्यातील 40 प्रगतिशील शेतकरी यांचाही सलादे बाबा बळीराजा कृषी सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. आपल्या परिसरातील प्रगतिशील शेतकरी व प्रक्रिया उद्योग करणारे शेतकरी यांची नावे आयोजकांना सुचवण्याची विनंती ट्रस्टचे सचिव राहुल भिकाजी पाचोरकर यांनी दिली. जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्याच्या बैठकीत, उत्तम भोसले, दत्तात्रय निखाडे, दीपक पाचोरकर, गोटीराम जमदाडे, महेंद्रसिंग परदेशी, सुरेश तात्या उशीर, अनिल पवार ,सोनू सगर , दत्तात्रेय शिंदे, सुरेश सलादे, दौलत पाचोरकर, दिलीप पाटील, मानसिंग ढोमसे हे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.