Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

समर्थ वार्तापत्र

समर्थ वार्तापत्र

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याच्या निर्णयाचा जाहिर तीव्र निषेध

 इगतपुरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन


लक्ष्मण सोनवणे,  इगतपुरी

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याच्या निर्णयाचा तीव्र निषेध व्यक्त करीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशान्वे  इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर मविप्र संचालक संदीप गुळवे यांच्या नेतृत्वाख़ाली इगतपुरीचे तहसीलदार  परमेश्वर कासुळे यांना काँग्रेस कमिटीच्या वतीने नुकतेच निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पाया रचलेल्या राज्यघटना आणि लोकशाही व्यवस्थेची हत्या करण्याचे षडयंत्र केंद्रातील मोदी सरकार करीत आहे. या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी विविध घोषणा देऊन निषेध व्यक्त केला. 
याप्रसंगी  इगतपुरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश सदाशिव जाधव, उपाध्यक्ष लकी गोवर्धने , उपाध्यक्ष उत्तमराव शिंदे शेतकरी नेते पांडुमामा शिंदे, खरेदी विक्री संघाचे व्हा. चेअरमन जयराम धांडे, कचरू पाटील शिंदे, संतोष सोनवणे, रामदास बाबा मालुंजकर, सुदाम भोर, उत्तम शिंदे, वि.का.सो.चेअरमन नामदेव शिंदे, दिलीप जाधव, अरुण गायकर, संपत मुसळे, सुरेश धोंगडे, योगेश सहाणे, पांडुरंग कोकणे, चंदूशेठ किर्वे, प्रकाश पंडित,  सामाजिक कार्यकर्ते प्रशांत जगताप आदी कार्यकर्ते उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.