दिपक ढोकळे, येवला
जळगाव नेऊर ते जऊळके रस्ता हा गेल्या पंधरा वर्षापासून दयनीय अवस्थेत आहे.या अनुषंगाने येथील रस्ता धारकांना कडून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे.या रस्त्या कडे प्रशासनाचे लक्ष नसल्याने या रस्त्या संदर्भात जळगाव नेऊरचे व जऊळके गावचे नागरिक आता एकवटले आहे.हा रस्ता तात्काळ दुरूस्त न झाल्यास पुढील उपाययोजना करण्यासाठी जळगाव नेऊर व जऊळके येथील शेतकरी,ग्रामस्थ,तसेच वाडी वस्तीवरील नागरीक एकवटत एकत्रित मिटींगचे आयोजन केले होते.मिटींगमध्ये प्रत्येकाने रस्त्याबाबत संताप व्यक्त करत प्रशासनाने लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करण्याची अपेक्षा व्यक्त केली.सध्याच्या अवस्थेत या रस्त्याने दिवसासुद्धा पायी चालणे कठीण झाले आहे.तर रात्रीच्या वेळेस तर अत्यंत वाईट अनुभव येतो.पावसाळ्यात तर सर्व खड्डे पाण्याने तुडुंब व पुर्ण रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य असते त्यातून वाट शोधावी लागते.शेतकऱ्यांना आपला शेतीमाल बाजारपेठेत नेण्यासाठी,शालेय विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी,दररोजची रहदारी करण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.शेतकऱ्यांच्या वाहनांचे दररोज नुकसान होवून वाहने खिळखिळी होत आहे.पर्यायी रस्ता नसल्याने या रस्त्याने ये जा करणाऱ्या नागरिकांच्या सहनशीलतेची हद्द संपल्याने तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला जात आहे.दोन वर्षापूर्वी लोकवर्गणी करून रस्त्यावरील मोठे मोठे खड्डे बुजविण्यात आले होते.जळगाव नेऊर परिसरातील सर्व रस्त्यांचे आत्तापर्यंत दोन तीन वेळा कामे झाली. जळगाव नेऊर व जऊळके रस्त्याचे काम माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी पंधरा वर्षापूर्वी केले.त्यानंतर या रस्त्याचे कोणत्याही प्रकारचे काम झाले नाही.या वर्षीच्या पावसाळ्यापूर्वी सदर रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे समाविष्ट करून डांबरीकरणासह मजबूतीकरण व्हावे.पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी दोन्ही बाजूने नाल्या कराव्यात या प्रमुख मागणीसाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनास निवेदन देण्याचे मिटींगमध्ये ठरले.मिटींगसाठी शेतकरी खंडू चव्हाणके,निवृत्त सुभेदार आनंद गुंड,सुदाम चव्हाणके,शरद तिपायले,दिनकर शिंदे,सुनील चव्हाणके,सुभाष चव्हाणके,प्रकाश तिपायले,कैलास चव्हाणके, योगेश वाघ,विजय चव्हाणके,अनिल चव्हाणके, मोहन शिंदे,चंदू वाघ,सचिन चव्हाणके,गणेश वाळके,राजेंद्र शिंदे,भाऊराव वाळके,सतीश चव्हाणके,विजय शिंदे,नितीन शिंदे, दीपक शिंदे,महेश गुंड, संजय वाळके,भाऊसाहेब शिरसाठ,राजाराम चव्हाणके, कैलास वाघ, सुरेश वाघ,वाल्मीक शिंदे,अमोल चव्हाणके,अनिल गवंडी,चंद्रभान गुंड,भाऊसाहेब जाधव,केदार कुऱ्हाडे,बापू चव्हाणके,हरिभाऊ भड,प्रवीण शिंदे,धोंडीराम तिपायले,उत्तम सोनवणे,प्रकाश सोनवणे,राधू शिरसाठ,जनार्दन भड,मनोज आजगे,सुनील कानडे,कैलास वाघ,हिरामण वाघ,दीपक वाघ आदी उपस्थित होते.

