Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

समर्थ वार्तापत्र

समर्थ वार्तापत्र

८७ हजार ३६० रुपयांची बेकायदा देशी दारु जप्त; एकास अटक

वणी/प्रतिनिधी


वणी पोलिसांनी अवैध देशी दारु विक्री विरोधात धडक मोहीम सुरु केली.वणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक  निलेश बोडखे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दि.३१ मार्च रात्री २.३० वाजताच्या देवठाण शिवारात  छापा टाकुन  ८७ हजार ३६० रुपयांची बेकायदा  देशी दारु जप्त केली असुन या प्रकरणी एकास  अटक करण्यात आली आहे.. 

देवठाण येथील एका घरात देशी दारुचा  बेकायदा साठा  असल्याची  माहीती  सपोनी निलेश बोडखे यांना मिळाली. मध्यरात्री देवठाण येथील भगवान गुंबाडे (वय ३०) याचे घराचे पाठीमागील पडवीत धाड टाकली असता ८७ हजार ३६० रुपयांचे प्रीन्स संत्रा  देशी दारुचे २६ बाॕक्स ,प्रत्येकी एका बाॕक्समधे ४८ क्वार्टर अशा एकुण १२४८ क्वार्टर ,प्रत्येक बाटली १८० मीली मापाची ७० रुपये किमतीची  असा साठा  बेकायदेशीर  विक्री  करण्यासाठी साठवणुक केलेला आढळुन आल्याने  पोलीसांनी सदर ऐवज जप्त केला असुन भगवान  गुंबाडे याचेवर गुन्हा दाखल करुन त्यास अटक करण्यात आली आहे वणी पोलीस ठाणे  कार्यक्षेत्रात अवैध व्यवसाय सुरु असतील तर त्याची  माहीती देण्याचे आव्हान करण्यात आले आहे  या कारवाईमुळे अवैध दारु विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे .सहाय्यक  पोलीस निरीक्षक निलेश बोडखे, पो ना सुमित जाधव, ए एम जाधव ,पो ना उदार, पो शि किरण धुळे पोलीस नाईक कुणाल मराठे यानी ही मोहीम राबविली असुन अधिक तपास निलेश बोडखे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक कुणाल मराठे, पो. ना. सुमित जाधव, पो. ना. उदार, पो. शि.किरण धुळे करत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.