प्रभू नयन फाउंडेशन, श्री साई साया बहुउद्देशीय संस्थांचा उपक्रम
लक्ष्मण सोनवणे, इगतपुरी ...
इगतपुरी तालुक्यातील आदिवासी भागातील वैतरणा परिसरातील गोरगरीब बांधवांना रामनवमीच्या निमित्ताने कपडे व खाऊचे वाटप करण्यात आले. प्रभू नयन फाउंडेशनचे अध्यक्ष आनंद मवाणी श्री साई साया बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष विजय गडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी दुर्गम आदिवासी पाड्यावर जाऊन कपडे खाऊ वाटप करण्यात आल्याने आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद द्विगुणित झाला. यावेळी नागोसलीचे माजी उपसरपंच बाळासाहेब शिंदे, सामाजिक कार्यकर्ते विजय गडाळे, धर्मा खोडके, नामदेव खातळे, रामेश्वर खातळे, सुमित बोधक, निखिल कर्पे, प्रमोद डेंगळे, पंढरी होले, जगन होले आदी उपस्थित होते. गोरगरिबांची सेवा हीच ईश्वरसेवा असून श्री साईनाथांच्या आशीर्वादाने आम्ही गरजू व्यक्तींचा शोध घेऊन नेहमीच मदत करणार आहोत असे श्री साई साया बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष विजय गडाळे यांनी सांगितले.

