Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

समर्थ वार्तापत्र

समर्थ वार्तापत्र

जानोरी येथे रामनवमी निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्थापना

 कु. प्रतीक्षा एकनाथ बोराडेचे व्याख्यान

लक्ष्मण सोनवणे, इगतपुरी ...



 स्त्रीमध्ये ज्याला आई दिसते तोच खरा शिवबा आहे. मुलांना घडविण्यासाठी महिलांनी जिजामाता होणे गरजेचे आहे. त्यांच्यावर  योग्य संस्कार करणे गरजेचे आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास धाडसाचा पराक्रमाचा असून त्यांचे आचार विचार डोक्यात घ्या. प्रत्येकाने  छत्रपतींच्या विचारांचा वारसा घ्यावा असे प्रतिपादन शिवचरित्रकार कु प्रतीक्षा बोराडे हिने केले. 

इगतपुरी तालुक्यातील जानोरी  येथे रामनवमीच्या मुहूर्तावर येथील ग्रामस्थांनी  तसेच सार्वजनिक मित्र मंडळाने मारुती मंदिराशेजारी  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या  पुतळ्याची  स्थापना केली. याप्रसंगी कु प्रतीक्षा बोराडे शिवाजी महाराजांचे विचार सांगताना बोलत होती. भगवा त्रिवेणीचा संगम असून शिवबांनी जातीपातीचा विचार केला नाही. कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला नाही. सर्वांना एकत्र करून स्वराज उभे केले. ताठ मानेने जगायचे असेल तर  शंभर  माणसांनी एकत्र येऊन पाऊलावर पाऊले ठेवणे गरजेचे आहे. व्यसनांपासून दूर राहणे गरजेचे आहे. तरुण पिढीने वाईट गोष्टीत पाय घसरून देऊ नका  शिवाजी महाराजांच्या इतिहासाला उजाळा  देणे गरजेचे आहे. याप्रसंगी शिवचरित्रकार आकाश भोर  यांनीही शिवाजी महाराजांचे विचार सांगितले. जानोरी येथील अगदी कमी वयात शिवचरित्रकार झालेल्या कु प्रतीक्षाच्या व्याख्यानाचे ग्रामस्थानी कौतुक केले. तपोनिधी प.पू. संत सद्गुरू श्री स्वामी अक्षय महाराज यांच्या आशीर्वादाने प्रतीक्षा इयत्ता पाचवीपासून वारकरी शिक्षण घेते. तिची आई शीतल यांनी जिजाऊप्रमाणे तिला संस्कारित केले आहे. इयत्ता आठवीत असलेल्या  प्रतिक्षाचे गुरू साकुर येथील हभप  पंढरीनाथ महाराज सहाणे यांनी तिला वारकरी शिक्षण दिले आहे. प्रत्येकाने  निर्व्यसनी राहण्याचा प्रयत्न करा जीवन धन्य होईल असे प्रतिक्षाने संदेश दिला. याप्रसंगी गावातील ग्रामस्थ, महिला, तरुण वर्ग सार्वजनिक मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.