श्री क्षेत्र अंजनापुर ता.कोपरगांव येथे भगवंताच्या कृपेने थोर संतांच्या आशिर्वादाने योगिराज प.पु. तुकाराम बाबा खेडलेकर, वैराग्यमुर्ती प.पु. काशिनाथ बाबा खेडलेकर यांचे आशिर्वादाने व वैराग्यमुर्ती प.पु बबनजी महाराज गाडेकर, ह.भ.प बबन महाराज गव्हाणे, ह.भ.प.भास्कर महाराज गव्हाणे ह.भ.प. शिवनाथ महाराज गव्हाणे यांचे मार्गदर्शनाखाली व रामप्रभु महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवार ३० मार्च ते गुरुवार ६ एप्रिल या कालावधीत श्रीराम नवमी ते हनुमान जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताह होणार आहे. तरी भाविकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ अंजनापुर यांनी केले आहे.
*दैनंदिन कार्यक्रम----*
पहाटे ४ ते ६ काकडा भजन, सकाळी ७ ते १० पारायण, सकाळी १० ते १२ गाथा भजन, सायंकाळी ४ ते ५ प्रवचन ,सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ ,रात्री ७ ते ९ हरीभजन / नंतर महाप्रसाद व हरीजागर
*कीर्तनाची रूपरेषा पुढील प्रमाणे--*
गुरुवार ३० मार्च रोजी रात्री ७ ते ९ ह.भ.प.गणेश महाराज वाघमारे, जागर गांवे -सायाळे, बहादरपुर
शुक्रवार ३१ मार्च रोजी रात्री ७ ते ९ ह.भ.प. बाजीराव महाराज चंदीले (नाना) वारकरी शिक्षण संस्था, आळंदी चिटणीस,जागर गावे- शहापुर,बहादरपुर, शनिवार १ एप्रिल रोजी रात्री ७ ते ९ हभप ह.भ.प.प्रदिप महाराज नलावडे ,जागर गावे-जवळचे धोंडेवाडी वेस, रविवार २ एप्रिल रोजी रात्री हभप प पु नित्यानंद गिरीजी महाराज (पिंपळवाडी) जागर गावे -सोयगांव, रांजणगांव देशमुख
सोमवार ३एप्रिल रोजी रात्री ७ ते ९ ह.भ.प उध्दवजी महाराज मंडलीक जागर गावे-भागवतवाडी मनेगाव, मंगळवार ४ एप्रिल रोजी रात्री ७ ते ९ ह भ.प. जयंत महाराज गोसावी (त्र्यंबकेश्वर) जागर गावे-डांगेवाडी,चिंचोली गुरव , बुधवार ५ एप्रिल रोजी रात्री रामायणाचार्य ह.भ.प.भास्कर महाराज रसाळ (आहेरगांव, निफाड)जागर गावे- काकडी ,अंजनापुर,
गुरुवार ६ एप्रिल रोजी सकाळी ९ ते ११ वा. ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज कदम (मोठे माऊली) अध्यापक वारकरी शिक्षण संस्था आळंदी यांचे काल्याचे किर्तन होईल व नंतर महाप्रसाद होईल.या सप्ताहात मृदंगाचार्य ह.भ.प. बाळा महाराज काळे,गायनाचार्य : स्वरअलंकार ह.भ.प. रविदास महाराज जगदाळे, भजनसम्राट, ह.भ.प. प्रकाश महाराज नाईकवाडे, हार्मोनियम :- ह.भ.प रंगनाथ महाराज रहाणे, ह.भ.प.वाल्मीक महाराज विधे, ह.भ.प. देवेंद्र महाराज गाडेकर.
मंगळवार दि. ४/४/२०२३ रोजी पिनाकेश्वर महादेव मंदीर जातेगाव ते श्रीक्षेत्र हनुमान देवस्थान अंजनापुर मशाल यात्रा आयोजित केली आहे.

