जि.प. सी.इ.ओ. व गटविकास अधिकारी यांनी
या प्रकरणाकडे लक्ष केंद्रित करावे
नागरिकांची दबक्या आवाजात मागणी
सुरगाणा तालुक्यातील हतगड येथे आठवडे बाजार भरला जातो .आणि त्या आठवडे बाजाराचा वार्षिक लिलाव हा लाखोंच्या घरात जात असतो.परंतु येथे सोयी सुविधांचा अभाव आहे. गाव स्वच्छ असेल तरच तेथे इतर विकास होऊ शकेल .गाव स्वच्छ ठेवण्यासाठी कोणीही उघड्यावर शौचास न जाणे हे अत्यावश्यक आहे. त्यामुळे शौचालय ही एक महत्त्वाची पायाभूत सुविधा आहे.ग्रामपंचायतीचे मुख्यालय असलेले गाव येथे स्त्री व पुरुष स्वतंत्र अशा पक्की व पर्याप्त पाणी उपलब्ध असलेली सुस्थितीत किमान एका सार्वजनिक शौचालय उपलब्ध असावे.ग्रामपंचायतने नागरिकांची गैर सोय दूर व्हावी यासाठी लाखो रुपये खर्च करून सार्वजनिक बांधकाम केलेले शौचालयला वर्षभरापासून कुलूप लावण्यात आले आहे.त्यामुळे नागरिकांना त्याचा उपयोग होत नाही. बाजारात येणारे ग्राहक आणि विक्रेत्यांची धांदल होत असल्याने भिंतीचे आडोसे मुत्रीघर ठरत आहे. जनतेच्या सेवा व उपयोगासाठी लाखो रुपये खर्चून बांधकाम करण्यात आलेले एक वर्ष होऊन ही त्याचे शौच खड्डा अपूर्ण अवस्थेत आहे .हे अपूर्ण अवस्थेत असलेले कुलूप बंद शौचालय कडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष होत असून शासनाचा निधी कुचकामी वापरात गेला आहे. तरी कुलूप बंद असलेले शौचालय खुले करण्यास ग्रामपंचायतला आता तरी मुहूर्त मिळेल का असा नागरिक दबक्या आवाजात सवाल करीत आहेत. तरी वरीष्ठ अधिकारी जिल्हा परिषद सी.ओ. अशिमा मित्तल, डेप्युटी सीओ रवींद्र परदेशी नाशिक , व सुरगाणा गटविकास अधिकारी दिपक पाटील यांनी लक्ष केंद्रित करून लाखों रुपये खर्चून बांधण्यात आलेला कुलूप बंद शौचालय का बंद असल्याचे चौकशी करण्यात येऊन संबंधित ग्रामपंचायत व ठेकेदार यांच्यावर कारवाई करून नागरिकांना वापरासाठी त्वरित चालू करावे .

