आपले धर्म, संस्कृती, परंपरा टिकवून ठेवा : श्रीरामचरित्र व्याख्याते हभप देविदास महाराज वारुंगसे
लक्ष्मण सोनवणे, इगतपुरी...
आपल्या हिंदुराष्ट्र व देशाची राष्ट्रीय अस्मिता भगवान राम आहे. एक आदर्श पुत्र ,बंधू पती, शिष्य,राजा व शत्रू असे एक ना अनेक गुण राम चरित्र मध्ये आहे. प्रभू श्रीराम समाजाचा एक आदर्श राष्ट्रपुरुष आहे. आपले कुटूंबपद्धती,आपला समाज,आपला देश धर्म याचे राष्ट्रीय एकात्मताचे प्रतिक राम आहे. तालुक्यातील सर्व गावात हा उत्सव व रथयात्रा यापुढेही काढण्यात येईल. तालुक्यात मोठ्या प्रमाणात धर्मांतर होत आहे. याबाबतही प्रत्येक गावकऱ्यांनी सावध रहावे व आपला धर्म ,संस्कृती ,परंपरा आपण टिकवून ठेवावी.मुलांवर संस्कार करावे असे प्रतिपादन श्रीरामचरित्र व्याख्याते हभप देविदास महाराज वारुंगसे यांनी केले. इगतपुरी तालुका श्रीराम मित्र मंडळ व सकल हिंदू समाज इगतपुरी तालुका यांच्यावतीने गावागावात रथयात्रा काढण्यात आली होती.याप्रसंगी सुमधुर आवाजात श्रीराम प्रभूंच्या आदर्श जीवनवर हभप वारुंगसे महाराज यांचे व्याख्यान झाले. तालुक्याच्या पूर्व भागातील गोंदे दुमाला परिसरातील गावांमध्ये टाळ मृदुंगच्या गजरात प्रभू श्रीरामचंद्र जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. सकाळपासूनच भक्तांमध्ये प्रचंड उत्साह जाणवत होता. श्रीराम प्रभूंच्या जयघोषाने परिसर दुमदुमला होता. कावनई, मुकणे, पाडळी, जानोरी, नानुरवैद्य, बेलगाव कुऱ्हे, कुऱ्हेगाव, सांजेगाव, मुरंबी, वाडीवऱ्हे, गोंदे दुमाला आदी गावातून श्रीराम प्रभूंचा जयघोष करीत रथ यात्रा काढण्यात आली होती. गोंदे गावात प्रदक्षिणा मारून आरतीने समारोप झाला. प्रत्येक गावात रथाचे आगमन झाल्यानंतर महिलांनी रथाचे मनोभावे औक्षण करीत जोरदार स्वागत केले. यावेळी श्रीराम मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सजन नाठे, परशराम नाठे, गणेश महाराज गवते, तानाजी नाठे, सागर नाठे, बंडू नाठे, संदीप नाठे, सुनील नाठे, मोहन जाधव, लालू नाठे, जयराम नाठे, सुनील तुकाराम नाठे, माजी सैनिक तुकाराम काजळे, गणेश मुसळे,राजाराम शिरसाठ ,तुकाराम गोवर्धने ग्रामस्थ, भजनी मंडळ आदी उपस्थित होते.
- दरवर्षी श्रीराम जन्मोत्सवानिमित्त एका दिवसात अकरा गावात रामरथ यात्रेचे आयोजन करून गाव प्रदक्षिणा केली जाते. श्रीराम मित्र मंडळाचा नऊ दिवस तालुक्यात रामरथ यात्रा काढण्याचा संकल्प आहे. कानाकोपऱ्य हिंदू धर्म, संस्कृती. येणाऱ्या पिढीला माहीत व्हावी, तसेच हिंदू धर्माचे महत्व पटवून द्यावे हा आमचा यामागचा उद्देश आहे.
सजन नाठे, संस्थापक अध्यक्ष श्रीराम मित्र मंडळ


