निफाड प्रतिनिधी--रामभाऊ आवारे
नाशिक येथील जेष्ठ नागरिक संघाच्या सदस्या श्रीम.कल्पना सोनार यांनी स्वतःच्या विवाह वर्धापन दिनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोदानगर येथे सर्व विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी केले पॅडचे वाटप...
आज मंगळवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२३ रोजी नाशिक येथील जेष्ठ नागरिक संघाच्या सदस्या श्रीम. कल्पना सोनार यांनी विवाह वर्धापन दिनानिमित्ताने गोदानगर प्राथमिक शाळेत सर्व १०० विद्यार्थ्यांना दर्जेदार १०० पॅडचे वाटप केले.
श्रीम. कल्पना सोनार आणि त्यांचा सुपुत्र अंशुमन सोनार यांनी दूरध्वनी वरून शाळेचे उपक्रमशील मुख्यध्यापक श्री. नवनाथ सुडके यांच्याशी संपर्क करून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोदानगर येथील विद्यार्थी आणि शिक्षकांच्या समस्या जाणून घेत शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मदतीची इच्छा व्यक्त केली. शाळेचे मुख्याध्यापक श्री.नवनाथ सुडके यांनी एप्रिल महिन्यात वार्षिक परीक्षा होणार असून विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका व्यवस्थीत लेखन करण्यासाठी पॅडची आवश्यकता असल्याचे सांगितले.
जेष्ठ नागरिक संघाच्या सदस्या श्रीम. कल्पना सोनार यांनी स्वतःचा विवाह वर्धापन दिना निमित्त वाढदिवस अमृतधाम नाशिक जेष्ठ नागरिक संघाचे पदाधिकाऱ्यांसोबत दर्जेदार १०० पॅड देण्याचे कबूल केले आणि त्याची पूर्तताही तात्काळ केली. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पॅड मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. गोदानगरच्या विद्यार्थ्यांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा स्विकारताना श्रीम. कल्पना सोनार आणि मुलगा अंशुमन यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देत समाधान व्यक्त केले.
आजच्या कार्यक्रम प्रसंगी अमृतधाम जेष्ठ नागरिक संघाच्या उपाध्यक्षा सौ. सुलभा लांडे सदस्य श्री. मधुकर लांडे, अण्णासाहेब संत, तसेच सायखेडा ग्रामपालिकेच्या सदस्या शोभा डंबाळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. जालिंदर गांगुर्डे,जयश्री जाधव उपस्थित होते. सदरच्या कार्यक्रमाचे दानशूर व्यक्ती श्रीम. कल्पना सोनार यांचा परिचय मुख्याध्यापक श्री. नवनाथ सुडके यांनी दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपशिक्षिका स्मिता लांडे - सुडके यांनी केले. मुख्याध्यापक श्री. नवनाथ सुडके यांनी पाहुण्यांसमोर गोदानगर शाळेचा लेखाजोखा सदर केला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक ताईबाई कोकाटे, सोमनाथ महालपूरे यांनी विशेष परिश्रम घेतले. स्मिता लांडे - सुडके यांनी आभारपत्र वाचन करत श्रीम.कल्पना सोनार, मुलगा श्री. अंशुमन सोनार आणि नातू चि.अर्जुन यांच्यासह सर्व उपस्थितांचे आभार मानले.
सदरच्या उपक्रमांचे कौतुक परिसरातील ग्रामस्थ, पालक यांच्यासह गटशिक्षणाधिकारी श्रीम. प्रिती पवार, विस्तार अधिकारी श्री. कैलास बोरसे, केंद्रप्रमुख श्री. प्रदीप कुटे यांनी केले.

