Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

समर्थ वार्तापत्र

समर्थ वार्तापत्र

अखिल भारतीय सैनी(माळी) सेवा समाज संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी विजय राऊत यांची निवड



नाशिक : अखिल भारतीय सैनी(माळी) सेवा समाज संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी विजय राऊत यांची निवड यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. महिला प्रदेश अध्यक्षपदी मुंबईच्या डॉ.मनीषा बनकर यांची निवड करण्यात आली असून संघटनेचे दिल्ली,पंजाब हरीयाना,उत्तर प्रदेश,राजस्थान ,छत्तिसगढ,मध्यप्रदेश यासह देशभरात चांगले संघटन आहे.संघटनात्मक फेरबदल करण्यात आहे आले.

        देशभरात माळी समाजाची संख्या १५% पेक्षा अधिक आहे त्यामुळे राष्ट्रीय राजकारणात माळी समाजाची भूमिका महत्वाची आहे.त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर समाजाचे संघटन मजबूत करण्याच्या हेतूने राष्ट्रीय अध्यक्ष उद्योजक दिलबाग सैनी यांनी अनेक राज्यांतील प्रदेशाध्यक्ष बदलण्यात आले.राऊत यांनी आत्तापर्यंत केलेल्या कार्याची दखल व राज्यभर असलेला दांडगा जनसंपर्क बघून महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी विजय राऊत यांची निवड करण्यात आली आहे.

        या निवडीनंतर बोलतांना विजय राऊत यांनी राज्यांतील संघटन मजबूत करण्याच्या हेतूने राज्यभर दौरा करण्यात येणार असल्याचे सांगतांना  राजस्थान मध्ये सैनी,उत्तरप्रदेश मध्ये मौर्य ,बिहार मध्ये कुशवाह ,दक्षिण भारतात रेड्डी अश्या विविध आडनावे देशभरात आहे यामधील अनेक लोकं देखील उद्योग ,नोकरी ,व्यवसाय आणि शिक्षणाच्या निमित्ताने महाराष्ट्रात राहत असल्याने त्यांना देखील संघटीत करून देशभरात मोठी ताकद उभी करण्याचा मानस व्यक्त केला.

       विजय राऊत यांच्या निवडीबद्दल माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ ,राष्ट्रीय अध्यक्ष उद्योजक दिलबाग सैनी,उपाध्यक्ष ताराचंद गहलोत,उपाध्यक्ष संदीप नाईक,सरचिटणीस पी.एम सैनी,ज्येष्ठ नेते उत्तमराव तांबे,भवरलाल टाक,वर्षा नाथ ,सुजाता इळवे,किरण बिडकर,कैलास सैनी,संतोष मौर्य,लल्लन मौर्या,मयूर मोटकरी,उपेश कानडे,महेश गायकवाड,मंगला माळी,प्रभाकर क्षिरसागर,शंतनू शिंदे ,सचिन दप्तरे यांच्यासह देशभरातील संघटनेच्या पदाधिकार्यांनी अभिनंदन केले.        



 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.