निफाड प्रतिनिधी--रामभाऊ आवारे
शिरवाडे तालुका निफाड येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुनीता बाळासाहेब चिताळकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.
शिरवाडे ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूकीत डॉ.श्रीकांत आवारे यांच्या नेतृत्वाखाली पाच महिला बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्या सर्वच महिलांना उपसरपंचपदाची संधी देण्यात येणार आहे. त्यानुसार पहिल्या वर्षी आदिवाशी महिलेला उपसरपंच करून गावात इतिहास घडला होता. शिरवाडे येथे दलित समाजाची लोकसंख्या अत्यंत कमी असल्याने त्यांना सरपंच निवडीत आरक्षण मिळत नाही, त्यामुळे या समाजाला आजपर्यंत संधी मिळाली नाही. वनिता धनराव यांच्या रूपाने शिरवाडे ग्रामपंचायतीच्या इतिहासात पहिल्यांदा दलित महिलेची उपसरपंच म्हणून निवडीने पुन्हा इतिहास घडला आहे. आवर्तन पद्धतीने सौ.वनिता धनराव यांनी राजीनामा दिल्यानंतर उपसरपंच निवडीसाठी सरपंच डॉ.श्रीकांत आवारे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रा.पं.कार्यालयात बैठक घेण्यात आली. बैठकीस कविता आवारे, वनिता धनराव, गया निकम, अरुण निकम, विशाल आवारे, सुनीता चिताळकर, नंदा निकम हे सर्व सदस्य उपस्थित होते. सदस्य विशाल आवारे यांनी सुनीता चिताळकर यांच्या नावाची सूचना मांडली. सर्व सदस्यांनी एकमताने अनुमोदन दिल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. सहा.निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेवक सुनील शिंदे, मधुकर ठोंबरे यांनी काम पाहिले.
याप्रसंगी उपस्थित चेअरमन ज्ञानेश्वर आवारे, मधुकर चिताळकर, सजन चिताळकर, निशिकांत चिताळकर, बाळासाहेब चिताळकर, गोरख निकम, माधव धनराव आदींनी त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन केले.

