लक्ष्मण सोनवणे, इगतपुरी...
इगतपुरी तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या धामणी ग्रामपंचायतिच्या उपसरपंचपदी सौ .रंजना लाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आवर्तन पद्धतीने मावळत्या उपसरपंच सरला नारायण भोसले ह्यांनी राजीनामा दिल्याने उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली. माजी उपसरपंच गौतम भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. गौतम भोसले यांनी पॅनलचे नेतृत्व केले ,अध्यासी अधिकारी म्हणून सरपंच बन्सी गोडे यांनी काम पाहिले. ग्रामसेवक सुभाष ठाकरे यांनी त्यांना सहाय्य केले. उपसरपंच पदासाठी रंजना लाड ह्यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली. त्यांच्या निवडीचे माजी आमदार तथा खरेदी विक्री संघाचे नवनिर्वाचित चेअरमन शिवराम झोले, जिल्हा नेते संदीप गुळवे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख निवृत्ती पाटील जाधव आदींनी स्वागत केले.मावळत्या उपसरपंच सरला भोसले, ग्रामपंचायत सदस्य गौतम भोसले, महेंद्र पगारे, रोहिणी घोटे, सुरेश गांगड, बाळू जाधव, मंदा उघडे, रंजना आगिवले हजर होते. स्वराज्य संघटनेचे तालुकाध्यक्ष नारायण भोसले, धनंजय भोसले,सोपान भोसले, गोपाळा भोसले, बाळू भोसले, शिवाजी भोसले, ईश्वर भोसले, बहिरू भोसले, राजू भोसले, सागर भोसले आदींनी निवडीचे स्वागत केले. भाऊसाहेब गायकवाड, विनायक लाड, मनोज लाड, राहुल लाड, जालिंदर लाड, शिवनाथ लाड, ज्ञानेश्वर भोसले, शिवाजी भोसले, ज्ञानेश्वर बहिरू भोसले, परसराम भोसले, दिलीप घोटे, पंकज भोर, सुदाम भोसले, बबलू भोर यांच्यासह बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.