रामभाऊ आवारे निफाड
प्रजापालक याचा अर्थ समस्त प्रजेचे पितृत्व घेणे जसे आपल्या बालकांची आपण देखभाल करतो तसेच आपल्या प्रजेची काळजी घेणे आणि त्यासाठी आजही आपण रामराज्य यावे हीच प्रार्थना सुयश चिंतत असतो. राम हा कृपाळू दयावंत राजा. मोह ,माया, त्यागुन निस्सीम प्रेम कसे करावे याचे उदाहरण प्रभू रामचंद्र आहेत .रामचिरित्रात महत्त्वाचा भाग भक्ताच्या चरित्राचा आहे म्हणून भरतादी राम भक्त यांच्या चरित्राचा अभ्यास केला पाहिजे. रामायणातील भरताची भक्ती अपूर्व आहे राम वनवासात जाण्यास निघाल्यावर राजपदाचा मोह टाळून रामाच्या पादुका भरताने मागून घेतल्या आणि 14 वर्षे रामस्मरणाने राज्य केले किती तो मोहाचा त्याग हे आपल्याला जमू शकते का? खरं तर मानवी आयुष्य हे विवंचना व अस्थिर आहे आणि ते जगताना आपल्या मनात मात्र कधीही मंथरेला स्थान देऊ नये भरत माता कैकयी ही तशी सर्व गुण संपन्न होती म्हणूनच राजा दशरथाच्या तिन्ही राण्यात तिचे स्थान सर्वात आधी होते. तिचा शब्द प्रमाण होता पण तिची दासी मंथरा होती हे मोठं दुःख आहे. रामराज्यात सर्व अगदी आनंदी जीवन जगत होते फक्त दुःखी होती मंथरा ती कैकयी ची दासी होती हितचिंतक होती. एका प्रसंगी कैकयीने तिला सुवर्णाचा हार भेट दिला आणि तिने त्याच् हाती तो सुवर्णहार कैकयी कडे फेकला म्हणतात दान देताना त्याचा प्रभाव इतका तेज असतो की समोरच्याची निक्षण सर्व शक्ती संपवतो नेमके तेच झाले उलट हाताने हार देताना एक क्षण कैकयी विचारक्षीण झाली आणि विचारांचे आसन मात्र उलट झाले कैकयी च्या मनावर मंथरेचे अधिराज्य झाले. तिने कैकयी ला दशरथ राजाकडून दोन वर मागण्यास सांगितले एकतर रामाला 14 वर्षे वनवास आणि भरताला राज्याभिषेक ... म्हणून सामाजिक व्यवहारिक जीवनात मंथरे चे अधिराज्य कधीही मनावर येऊ देऊ नये किंबहुना राजकर्त्यांनी तर रामराज्य अपेक्षा करताना आपल्या अवतीभवती तर मंथरा नाही ना? हा विचार करणे गरजेचे आहे कारण राजा हा प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नसतो जात असतो त्याचा दूत, प्रधान, सेवक आणि खऱ्या अर्थाने हेच राज्यकारभार चालवण्यास महत्वाचा भाग असतात त्यामुळे राज्यपालात या सर्वांचे विचार, आचरण, कर्तुत्व हे राजाला दिशा देणारे असते.. प्रभू रामचंद्र नसतानाही भरताना 14 वर्षे राम राज्य केले कारण त्याने राजपद मोह टाळला रामरायांच्या पादुका सिंहासनावर ठेवून त्याची पूजा करूनच न्यायदंड स्वीकारला. सर्व कृती रामाला समर्पित केली. साक्षात भगवंताच्या काळात कशाला होईल दुराचार म्हणजे शक्तीपेक्षा सामर्थ्य, वृत्तेपेक्षा कृती ,लबाडी पेक्षा सशक्त विचार, कृतघ्नता पेक्षा परोपकार, परिपूर्ण रामराज्य करण्यास मानवी जीवनाला दिशा देणाऱ्या आहेत. हे प्रत्येक राजकारण्याने अनुकरण करणे गरजेचे आहे. कारण कोणत्या निसटत्या क्षणी मंथरे चा मनावर प्रभाव होईल आणि विनाशाकडे पाय वळतील हे सांगताही येणार नाही .मला रामासारखे व्हायचे असे आपण नेहमीच म्हणतो पण एकदा तरी आयुष्यात भरताच्या त्यागाची कल्पना करून जगता आले पाहिजे... राज मोह टाळून रामाचा दास होणारा भरत होता आलं पाहिजे .कैकयी वाईट कधी नव्हतीच पण तिच्या मनावरील अधिराज्य गाजवणाऱ्या मंथरेने घात केला आणि तिच्यातील गुणांपेक्षा अवगुणांची दखल मात्र रामायणात झाली. रामायणातील या सर्व पात्रांचे अवताररुपी कार्य समजून घेतल्यास राम समजण्यास अवघड नाही जय श्रीराम जय श्रीराम.

