Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

समर्थ वार्तापत्र

समर्थ वार्तापत्र

संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या अध्यक्षपदी कॉ. इंद्रजीत गावीत

 लक्ष्मण पवार, हतगड...

 कॉ. इंद्रजीत गावीत

माननीय पालकमंत्री नाशिक जिल्हा यांच्या शिफारशीनुसार, संदर्भिय नियम ३'४  नुसार सुरगाणा तालुक्यासाठी अध्यक्ष व अशासकीय सदस्यांची संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीवर अकरा सदस्यांची निवड करण्यात आली आहे.
या समितीच्या अध्यक्षपदी सुरगाणा तालुक्याचे  माजी सभापती, तथा डीवायएफआय युवा संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे नेते कॉ. इंद्रजीत जीवा गावीत यांची निवड करण्यात आली आहे. तालुक्यातील निराधार जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन, तालुका जिल्हा आणि राज्य स्तरावर मोर्चे काढून शासनाकडे अनुदान वाढ, निराधार योजनेच्या जाचक अटी आणि काही अडचणी दूर करण्यासाठी पुढाकर घेतला आहे. तालुक्यातील गोर गरीब निराधार नागरिक या योजनेपासून वंचित आहेत. त्या वंचीत राहिलेल्या सर्व लाभधारकांना इंद्रजीत गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच फायदा होणार आहे, त्यांनी आपल्या कार्यात नेहमीच निराधार जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत.  लाभधारकांना घेउन ते स्वतः तहसील कार्यालयात धाव घेत असतात. वेळोवेळी निवेदने देत असतात त्यामुळे पालकमंत्री साहेबांनी कॉ .इंद्रजीत गावीत यांची समितीच्या अध्यक्षपदी निवड केल्याने त्यांचे सर्वत्र स्वागत व अभिनंदन होत आहे.
या समितीवर बी.डी.ओ, तहसिलदार, सी.ई.ओ, झेडपी अधिकारी तसेच इतर विविध क्षेत्रे व प्रवर्गातील सदस्यांची निवड करण्यात आली आहे.
  लाँग मार्च मोर्चाच्या निमित्ताने विविध मागण्या माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी विधिमंडळाच्या पटलावर घेतल्याने त्या मागण्यांची अंमलबजावनी त्वरित सुरु केली आहे. त्यापैकीच ही मागणी असल्याने माननीय पालकमंत्री नाशिक जिल्हा यांनी ही संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती स्थापन करून , निराधार योजनेच्या लाभधारकांना त्वरित या योजनेचा लाभ मिळावा, कोणीही लाभधारक वंचीत राहू नये, यासाठी त्यांनी व त्यांच्या मंत्रिमंडळाने घेतलेला हा महत्वाचा निर्णय ठरतो आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.