Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

समर्थ वार्तापत्र

समर्थ वार्तापत्र

अंजनेरी गडावर जय बाबाजी परिवाराच्या वतीने जपानुष्ठानाचा शुभारंभ !

 श्रीसंत सदगुरु स्वामी शांतिगिरीजी महाराजांच्या उपस्थितीत आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

अमर आढाव, ओझर ...

निष्काम कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराजांच्या कृपाशीर्वादाने उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी श्रीसंत सदगुरू स्वामी शांतीगिरीजी महाराजांच्या प्रेरनेने व प्रमुख उपस्थितीत हनुमान जयंती उत्सवा निमित्त जन्मभूमी अंजनेरी गडावर प्रतिवार्षिक जपानुष्ठान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून जय हनुमान,जय बाबाजी अशा जयघोषात पालखी मिरवणुक व विविध उपक्रमांसह निष्काम कर्मयोगी धर्म सोहळ्याचा उत्साहात प्रारंभ करण्यात आला.  

       श्रीराम भक्त हनुमंतरायाची जन्मभूमी असलेल्या अंजनेरी गडाचा सर्वांगीण विकास व्हावा या एकाच उद्देशाने गेल्या अनेक वर्षांपासून निष्काम कर्मयोगी जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज धर्मपीठाचे पिठाधिश्वर अनंत विभूषित समर्थ सदगुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने आणि प्रमुख उपस्थितीत श्रीक्षेत्र अंजनेरी गड येथे श्रीहनुमान जन्मोत्सवाचे  प्रतिवर्षी आयोजन करण्यात येते. याहीवर्षी मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पालखी मिरवणूक काढत निष्काम कर्मयोगी धर्म सोहळ्याचा प्रारंभ करण्यात आला.हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने आठवडाभर चालणाऱ्या या कार्यक्रमा दरम्यान जपानुष्ठान,अखंड नंदादीप,हस्त लिखित नामजप,व्यसन मुक्ती संकल्प,यज्ञ आणि रोज पहाटे ब्रम्हमुहूर्तावर पाच वाजता नित्यनियम विधी,प्राणायाम,ध्यान,भागवत वाचन,महाआरती, सकाळ- सायंकाळ प्रवचन,सत्संग आदी भरगच्च कार्यक्रम संपन्न होणार आहेत. 

भविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.