Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

समर्थ वार्तापत्र

समर्थ वार्तापत्र

राज्याचे माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांचे हस्ते डॉ. भागवत महाले यांचा सत्कार

 डॉ. भागवत महाले...


नाशिक, ता.१ महाराष्ट्र राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषद राज्यस्तरीय ३९ वे  अधिवेशन पिंपळगाव बसवंत येथे संपन्न झाले. यावेळी गुणवंत विद्यार्थी व प्राध्यापकांचा सत्कार पारितोषिक व प्रमाणपत्र देवून सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी  महाराष्ट्र राज्य माजी अर्थमंत्री मा. जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष  यांच्या हस्ते प्रा. डॉ. भागवत  शंकर महाले, राज्यशास्त्र विभाग प्रमुख,   त्र्यंबकेश्वर  महाविद्यालय  यांचा  उत्कृष्ट रिसर्च पेपर पारितोषिक मिळाल्याबद्दल  सत्कार करण्यात आला. त्यांना नुकताच समाजिकशास्त्रातील  पहिले  राज्यशास्त्र  विषयात पेटंट  मिळाले आहे. त्याबद्दल  मविप्र संस्था  सरचिटणीस मा. ॲड. नितीनजी ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता.  निफाड मतदार संघ आमदार मा. दिलीप बनकर , मविप्र समाज संस्था अध्यक्ष सुनील  ढिकले, उपाध्यक्ष, मविप्र समाज संस्था उपाध्यक्ष मा. विश्वासराव मोरे , मविप्र समाज संस्था सभापती  मा .बाळासाहेब क्षीरसागर , मविप्र समाज संस्था उपसभापती मा. देवराम मोगल,  मविप्र समाज संस्था चिटणीस मा. दिलीप दळवी , मविप्र संस्था संचालक मा. शिवाजीराव गडाख , मविप्र समाज संस्था महिला संचालिका मा. श्रीमती शोभाताई बोरस्ते, मा. निवृत्त प्राचार्य डॉ. पी. डी. देवरे  , प्रा डॉ लियाकत खान मुंबई विद्यापीठ, मुंबई.,  महाराष्ट्र राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन परिषद अध्यक्ष - प्राचार्य डॉ प्रमोद पवार, प्राचार्य डॉ मनोहर पाटील , मविप्र शिक्षणाधिकारी डॉ नितीन जाधव, शिक्षणाधिकारी व प्राचार्य डॉ भास्कर ढोके, शिक्षणाधिकारी  डॉ. ज्ञानेश्वर लोखंडे, शिक्षणाधिकारी व प्राचार्य डॉ विलास देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. प्राध्यापक प्रा डॉ भागवत महाले यांचा संपूर्ण महाराष्ट्र व जिल्ह्यातून अभिनंदन होत आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.