दिनांक ३० मार्च लाँग मार्च च्या अभूतपर्व यशानंतर पेठ येथे कॉ .जे पी. गावीत यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नियोजनाने, महाराष्ट्र राज्य किसान सभा, आणि नाशिक जिल्हा किसान सभा यांच्या पुढाकाराने आणि कॉ. जे. पी .गावीत यांच्या नेतृत्वाखाली दिंडोरी ते मुंबई पायी लाँग मार्च चे नियोजन करण्यात आले. सबंध महाराष्ट्रातील जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी हा लाँग मार्च यशस्वी ठरला. महाराष्ट्रतील शेतकरी शेतमजूर कामगार अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर्स पोलीस पाटील ग्रामपंचायत कर्मचारी शासकीय कर्मचारी यांच्या प्रश्नासाठी तसेच वनजमिन, वृद्धापकाळ पेन्शन योजना, कांदा प्रश्न, नदीजोड प्रकल्प, बोगस आदिवासीं हटाव, आशा मागण्या घेऊन लाँग मार्च मुंबई विधानभवनावर निघाला.
पंचवीस हजार लोकांच्या लाँग मार्च ची दखल माननीय मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांनी घेतली, लाँग मार्च चे नेते जे .पी. गावीत, डॉ डी .एल .कराड, डॉ अजित नवले आणि शिस्टमंडळ यांना त्वरित चर्चेसाठी बोलावले. सर्व मागण्यांवर चर्चा समाधानकारक झाल्याने माननीय मुख्यमंत्री यांनी मोर्चाच्या मागण्या त्वरित विधिमंडळ पटलावर घेतल्या. आणि मंजूर मागण्यांची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा व तालुका प्रशासनास सूचना दिल्या. या महत्त्वाच्या निर्णयामुळे सबंध नाशिक जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात लाँग मार्च विजयी मिरवणुका काढल्या. पेठ तालुक्यात पक्षाच्या वतीने विजयी सभा घेतली, पेठ शहरात विजयी मिरवणूक काढून कॉ .गावीत यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी पेठ तालुक्यातील माकप चे कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक, सरपंच, आणि नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. सबंध तालुक्यातून तीन ते चार हजार नागरिक सभेला उपस्थित होते. यावेळी कॉ जे .पी .गावीत, यांनी म्हंटले की आपण आत्ताच्या आपल्या लाँग मार्च आंदोलनातून एकूण चौदा मागण्यांमधून सत्तर टक्के मागण्या सरकारने मान्य केल्या, वनजमीन, वृद्धापकाळ पेन्शन योजना, कांद्याला भाव, छोटे मोठे पाझर तलाव बंधारे, असे प्रश्न मार्गी लागले आहेत, सरकारी कर्मचारी पेंशन योजना, ड घरकुल योजना यावर लवकरच तोडगा काढण्यात येणार आहे. मंजूर मागण्याची अंमलबजावणी काटेकोरपणे पार पाडण्यासाठी संघटन मजबुत ठेवणे गरजेचे आहे, एक विचाराने एकत्र येऊन संघटन मजबूत करा असे आवाहन करण्यात आले. यावेळी कॉ अफ्रोजा शेख,कॉ महेश टोपले, देवराम गायकवाड, कॉ वाकचौरे यांनी मंजूर झालेल्या मागण्या, मागण्याची अमलबजावणी याबाबद मार्गदर्शन केले, सभेला उपस्थित नागरीकांना संघटन मजबूत करुण कॉ. जे .पी .गावीत यांच्या पाठीशी खंबिरपने उभे राहण्याचे आवाहन केले, यावेळी पेठ शहरातील नगरसेवक, तालुका कमिटी सदस्य, जिल्हा कमिटी सदस्य, कॉ कैलास राऊत, कॉ.राहुल चोथवे, कॉ. राजू शेख, कॉ.अभिदिन शेख, आदी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.