शाळेतील विद्यार्थ्यांनी राजभाषा दिनाच्या स्वागतासाठी साकारली मानवी अक्षर कलाकृती
February 27, 2023
0
शरद लोहकरे,लासलगाव
मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने सरस्वती शाळेत 'मराठी राजभाषा सप्ताह' चे आयोजन करण्यात आले. सप्ताहाच्या सुरुवातीला कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे मुख्याध्यापक भीमराव शिंदे ,सुनिल आव्हाड ,नवनाथ जिरे यांनी केले तर मुख्याध्यापक भीमराव शिंदे यांनी राजभाषा दिनानिमित्त घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली.यामध्ये काव्य वाचन व गायन स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, प्रकट वाचन स्पर्धा,माझे आवडते कवी व लेखक तसेच मी वाचलेले पुस्तक या विषयांवर वक्तृत्व स्पर्धा ,मानवी अक्षर कलाकृती,रांगोळी स्पर्धा यांसारखे विविध उपक्रमांचे नियोजन मराठी सप्ताह मध्ये करण्यात आले.नवनाथ जिरे यांनी मराठी दिनानिमित्त विद्यार्थ्यांना माहिती सांगितली व काव्य गायन केले. या उपक्रमांसाठी सुनील आव्हाड ,कैलास पातळे,संदीप सूर्यवंशी,कांचन शेलार ,धर्मेंद्र निकम, रूपाली शिंदे ,मोहन नाईक,सोनाली होळकर, प्रदीप ठाकरे ,स्वप्नील आहिरे,रूपाली दिवटे ,दिपाली शेळके, हर्षदा अंभोरे आदी शिक्षकांचे सहकार्य लाभले.

