Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

समर्थ वार्तापत्र

समर्थ वार्तापत्र

मातोश्री कै.हौसाबाई दुसाने महिला पतसंस्थेच्या वतीने महिला दिन साजरा

विंचूर दि.७ (प्रतिनिधी)
येथील मातोश्री कै.हौसाबाई वामनशेठ दुसाने महिला ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने येथील अपर्णा प्राईड लॉन्स येथे जागतिक महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यू ब्लॉसम्स इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्राचार्या ज्योती माठा या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेच्या चेअरमन वैशाली दुसाने, व्हा.चेअरमन ज्योती शिरसाट या होत्या.
प्रारंभी मान्यवर महिलांच्या हस्ते लक्ष्मी मातेचे पूजन करण्यात आले.महिला दिना निमित्त संस्थेच्या वतीने कुटुंबातील महिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे ग्रिटींग कार्ड स्पर्धेचे तसेच कोपरगाव येथील प्रसिद्ध व्याख्यात्या वृंदाताई कोऱ्हाळकर यांचे दोन शब्द ताईसाठी या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी संस्थेच्या कार्यकारी संचालक रेणूका दुसाने यांनी आजही समाजातील अनेक महिला बॅंकींग व्यवहारा पासून दूर आहेत. त्यांना आर्थिक प्रवाहात आणणे, बचतीची सवय लावणे व महिलांचे सबलीकरण करण्यासाठी संस्थेची स्थापना करण्यात आली असे आपल्या प्रास्ताविकात नमूद केले. तर प्रमुख व्याख्यात्या वृंदाताई कोऱ्हाळकर यांनी महिलांना संबोधित करताना कुटुंबाला आनंदी ठेवण्याचे काम महिलाच करु शकतात.माहेरच्यां प्रमाणेच सासरच्या मंडळींना जपावे. कुटुंबातील वृद्धांना मानसन्मान द्यावा.पती व मुलांसोबत संवाद साधावा.मात्र या सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडतांना स्वतः च्या आरोग्याची काळजी घ्यावी.स्वत: ला वेळ द्यावा.व स्वतः वर प्रेम करावे.असे प्रतिपादन केले.तर ज्योती माठा यांनी चार भिंतीत अडकलेली स्त्री शिक्षणाच्या प्रवाहात आली आणि आज संसार सांभाळून विविध पदांपर्यंत झेप घेत आहे. ती केवळ महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या योगदानामुळे.असे विचार आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले.
दरम्यान ग्रिटींग कार्ड स्पर्धेत विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.स्पर्धेत प्रतिक्षा निफाडे ही ने विद्यार्थी गटातून प्रथम क्रमांक पटकावला तर प्रणाली थोरात द्वितीय व यशश्री शेवाळे या विद्यार्थीनीने तृतीय क्रमांक मिळविला. समिक्षा झाल्टे, ईश्वरी चव्हाण वैष्णवी थोरात या उत्तेजनार्थ पारितोषिकाच्या मानकरी ठरल्या. तर खुल्या गटात मयुरी जाधव प्रथम रोहीणी आहेर व काजल शिंदे यांनी द्वितीय तर ज्योती जेजूरकर,वनिता सोमासे यांनी तृतीय क्रमांक पटकावला.तर ज्ञानेश्वरी विभूते, अरुणा पवार,परेश बाहेती यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. ग्रिटींग कार्ड स्पर्धेेेेत ८८ महिलांनी सहभाग नोंदविला होता. यावेळी संस्थेच्या चेअरमन वैशाली दुसाने, व्हा. चेअरमन ज्योती शिरसाट, संचालक अर्चना पिंगळे, सविता दरेकर, गायत्री साईनकर,आंचल दुसाने, ज्योती सांगळे, ताराबाई क्षीरसागर, ज्योती कानडे,योगिता गाडे,स्मिता खांदोडे, वनिता गांगुर्डे,लता कोथमिरे, वंदना सरोदे, कविता गांगुर्डे,आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जयश्री नेवगे यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.