जागतिक महिला दिनानिमित्त विंचूरला ग्रीटिंग कार्ड स्पर्धा
February 25, 2023
0
विंचूर (प्रतिनिधी) -
येथील मातोश्री कै.हौसाबाई वामनशेठ दुसाने महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित विंचूर यांचे वतीने जागतिक महिला दिनानिमित्त ग्रीटिंग कार्ड स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. ही स्पर्धा मोफत असून उत्कृष्ट ग्रीटिंगला पारितोषिक देण्यात येतील. ही स्पर्धा दोन गटात होईल, पहिला गट शालेय,महाविद्यालयीन विद्यार्थी गट, तर दुसरा खुला गट. तसेच स्पर्धेत आलेल्या सर्वच ग्रीटिंग चे प्रदर्शन व बक्षीस वितरण महिला दिनानिमित्त येथील अपर्णा प्राईड या लॉन्स वर रविवार दिनांक ५ मार्च २०२३ रोजी दुपारी ४ ते सायंकाळी ७ या वेळेत वितरण करण्यात येईल.
ग्रीटिंग कार्ड साठी नियमावली पुढील प्रमाणे आहे. ग्रीटिंग ए फोर साईज च्या कार्डशिट कागदावर असावे, शब्दरचना 25 शब्दापर्यंत, ग्रीटिंगच्या मागे आपले नाव मोबाईल नंबर व पत्ता असावा, विद्यार्थी गट किंवा खुला गट असा उल्लेख असावा, ग्रीटिंग 28 फेब्रुवारी 2023 या अंतिम मुदतीच्या आत संस्थेच्या कार्यालयातील कार्यालयीन वेळेत जमा करावे, ग्रीटिंग स्पर्धा व व्याख्यानाचा कार्यक्रम महिला व पुरुष सर्वांकरिता खुला आहे.
महिला दिनानिमित्त कोपरगाव येथील सुप्रसिद्ध व्याख्यात्या सौ वृंदावन कोल्हाळकर यांचे दोन शब्द ताईसाठी या विषयावर व्याख्यान संपन्न होईल. अशी माहिती पतसंस्थेच्या चेअरमन सौ. वैशाली अविनाश दुसाने यांनी दिली.


