निफाड नगरपंचायत नगराध्यक्षपदी सौ. रत्नमाला संपतराव कापसे यांची निवड
February 23, 2023
0
राहुल कुलकर्णी,
निफाड/प्रतिनिधी
निफाड नगरपंचायत माजी नगरसेवक देवदत्त कापसे यांच्या मातोश्री सौ रत्नमाला संपतराव कापसे या आज दिनांक 23 फेब्रुवारी 2023 रोजी नगराध्यक्ष पदावर विराजमान झाल्या.
निफाड नगरपंचायत च्या माजी नगराध्यक्ष सौ कांताबाई कर्डिले यांनी स्वख़ुशीने राजीनामा दिला त्यानंतर नगराध्यक्ष रिक्त पदाकरिता सौ.रत्नमाला संपत कापसे यांनी निफाड नगरपंचायत चे मुख्याधिकारी यांच्याकडे आपला अर्ज दाखल केला होता एकच अर्ज दाखल झाल्यामुळे सौ रत्नमाला संपतराव कापसे यांची निफाड नगरपंचायत नवनिर्वाचित नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात येत आहे असे पिठासीन अधिकारी श्री शरद घोरपडे तहसीलदार निफाड यांनी जाहीर केले
त्यानंतर सर्व नगरसेवक यांनी पुष्पगुच्छ देऊन नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा सत्कार केला. निफाड नगरपंचायत परिसरात अतिउत्सहात नगराध्यक्ष यांचा सत्कार सोहळा पार पडला राजाभाऊ राठी यांनी सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषविले. नगरसेवक साहेबराव बर्डे सर यांनी प्रस्तावित सादर करत उपनगराध्यक्ष अनिल पाटील कुंदे यांच्याकडून नवनिर्वाचित नगराध्यक्षांना शुभेच्छा दिल्या. उपस्थित मान्यवरांमध्ये निफाड नगरपंचायत चे प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ शेलार यांनी आपले मनोगत व्यक्त करत सर्व अध्यक्षांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर राजाभाऊ राठी, शिवाजीराजे ढेपले, दिंडोरी लोकसभा संपर्कप्रमुख राजेंद्र सोनवणे, माजी जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब भवर, सचिन दरेकर, संजय शिरसागर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रम प्रसंगी माजी आमदार अनिल कदम, शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे यांनी देखील हजेरी लावली. नगरसेवक किशोर ढेपले, पल्लवी जंगम, संदीप जेऊघाले, अरुंधती पवार, शारदा कापसे, विमल जाधव, सुलोचना होळकर, सागर कुंदे, कविता धरराव, रूपाली रंधवे, जावेद शेख, कांताबाई कर्डिले, अलका निकम, सविता तातेड, संदीप शिंदे आदी नगरसेवक उपस्थित होते. त्याचबरोबर संपतभाऊ कापसे, रमेश जाधव, मधुकर शेलार, आसिफ पठाण, विक्रम रंधवे, दीपक गाजरे, कुमावत, मोहन जाधव, नितीन खडताळे, भास्करराव ढेपले, अंबादास गोळे, वाल्मीक कापसे, माणिक कुंदे, शिवाजी ढेपले, सुभाष कर्डिले, नंदलाल बाफना, रावसाहेब गोळे, महेश जंगम, सुभाष कुंदे, श्याम गोळे, शशांक सोनी, कैलास क्षीरसागर, नंदू कापसे, संजय धरराव, प्रकाश सुराणा, संजय शिरसागर, हरिश्चंद्र पवार, सचिन दरेकर, भारतीताई कापसे, मधुकर कापसे व गावातील नागरिकांनी उपस्थित राहून नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ रत्नमाला कापसे यांना शुभेच्छा दिल्या व देवदत्त कापसे यांनी उपस्तित सर्वांचे आभार मानले.

