Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

समर्थ वार्तापत्र

समर्थ वार्तापत्र

विंचूर येथे स्वभिमामी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको

विविध मागण्यासाठी शेतकरी आक्रमक
विंचूर ता.२२----- येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज रस्ता रोको आंदोलन करण्यात आला. नाशिक औरंगबाद माहामर्गावरील  बाजार समिती च्या  गेटसमोर स्वाभिमानी शेतकरी  संघटनेतर्फे 10 ते 15 मिनिट रास्ता रोको आंदोलन केले .यावेळी शेतकऱ्यांनी कांदे रस्त्यावर फेकून निषेध केला. तर काही शेतकऱ्यांनी  कांद्याची माळा गळ्यात घातल्या होत्या. स्वाभिमानीच्या कार्यकर्तेने जोरदार घोषणाबाजी करत हातात कांदे घेवून आंदोलन केले. तसेच नाशिक जिल्हा बँकेने 62 हजार शेतकऱ्यांच्या जमिनीचे लिलाव सुरू केले आहे या विषयी लक्ष वेधण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आहे. या वेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. विंचूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महामार्गावर आंदोलन केले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष निवृती गारे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांनी कांदे रस्त्यावर फेकून सरकारचा निषेध केला. सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न तीव्र झालेले आहेत. कांदे, द्राक्ष यासारख्या पिकांचे बाजारभाव गडगडले आहे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही. पिकविम्याचे पैसे मिळत नाही. तसेच वीजदर वाढ सरकारने प्रस्तावित केली आहे .एक बाजू शेतीमालाला भाव नाही या मुळे शेतकऱ्यांचे विज बिल थकले आहे त्यांचे कनेक्शन कट होत आहे.  यासह अनेक प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने  राज्यभरातील रस्ता रोको आंदोलन केले आहे. केंद्रात व राज्य आपले एकच विचाराचे सरकार असल्याने खत औषधांचे किमतीच्या नियंत्रण वरील प्रश्नाचे तत्काळ सोडवणूक करावे अन्यथा विधिमंडळाच्या अधिवेशनात आंदोलन करू असे इशारे निवेदनात दिले आहे.हे निवेदन लासलगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांना देण्यात आले यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नाशिक जिल्हा अध्यक्ष  निवृत्ती गारे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सिन्नर तालुका आत्माराम पगार,निफाड तालुका अध्यक्ष गजानन घोटेकर,प्रमोद गिते,भमाजी नगु आव्हाड, सिन्नर,सोमनाथ आव्हाड,राहुल आव्हाड,प्रकाश कांगणे,नवनाथ चव्हाणके,कारण कोकाटे,बाळासाहेब खलटे, माणिक कुयटे, संदीप दळवी, आदि शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.