श्रीक्षेत्र वनसगाव ते त्रंबकेश्वर पायी दिंडी सोहळा
January 10, 2023
0
१३ जानेवारी रोजी वनसगाव येथून सकाळी ९ वाजता होणार प्रारंभ--
निफाड रामभाऊ आवारे (धार्मिक वृत)
हभप गुरुवर्य भागवत महाराज शिंदे व संतदास हभप परमपूज्य बाबासाहेब महाराज शिंदे वनसगावकर यांच्या कृपाशीर्वादाने श्री संत निवृत्तीनाथ महाराज यात्रा श्रीक्षेत्र वनसगाव ते त्रंबकेश्वर पायी दिंडी सोहळा १३ जानेवारी ते १९ जानेवारी यादरम्यान होणार असून वनसगाव येथे तंटामुक्ती अध्यक्ष बाजीराव तात्याबा शिंदे यांच्या वस्तीवर दिंडीचे स्वागत होऊन दिंडी पुढच्या प्रवासाला निघणार असल्याची माहिती मुख्य मार्गदर्शक हभप संतदास बाबासाहेब महाराज शिंदे वनसगावकर यांनी दिली आहे.
दिंडीचे संपूर्ण नेतृत्व तुळशीराम महाराज शिंदे हे करणार असून कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे--
शुक्रवार १३ जानेवारी रोजी सकाळचा नाश्ता व चहा पाणी वामन बिरार उगाव, सोमनाथ खैरे नांदुर्डी, अरुण खापरे सुकेने व समस्त प्रेमी मंडळ पिंपरी रौळस, दुपार भोजन -भिमाजी कारभारी खापरे नांदुर्डी गणपती जवळ सायंकाळचे भोजन- मनोहर देवराम जाधव, बाजीराव देवराम जाधव यांच्या वस्तीवर ओणे रोड कसबे सुकेने, शनिवार १४ जानेवारी रोजी सकाळचा नाश्ता -गणपत विठोबा जाधव कसबे सुकेने, शिवाजी वामन ढिकले सय्यद पिंपरी, दुपारचे भोजन- निवृत्ती गणपत संगमनेरे खेरवाडी यांच्या वस्तीवर, शिवाजी वामन ढिकले सय्यद पिंपरी, सायंकाळ भोजन- वैकुंठ बाळासाहेब महाराज ढिकले अण्णा यांचे स्मरणार्थ सोमनाथ बाळासाहेब ढिकले यांच्या वस्तीवर रोड पिंपरी,रविवार १५ जानेवारी रोजी सकाळचा नाश्ता- राजेंद्र जमधडे आडगाव गं भा कृष्णाबाई शिंदे, वसंत मुरलीधर सालगुडे सर बळी मंदिराजवळ नाशिक, डॉ ठोंबरे धात्रक फाटा व बाळासाहेब शिंदे सर ,दुपारचे भोजन- वै कारभारी लक्ष्मण बोचरे देवगावकर वै संतोष लक्ष्मण बोचरे देवगावकर यांच्या स्मरणार्थ रवींद्र कारभारी बोचरे देवगाव, वडजे सर नाशिक आडगाव नाका पेट्रोल पंपाजवळ, सायंकाळ भोजन- वै मनोहर अनंत नांदुर्डीकर गुरुजी यांचे स्मरणार्थ नांदुर्डीकर बंधू व दौलतराव जाधव समता नगर सातपूर नाशिक, सोमवार १६ जानेवारी रोजी सकाळचा नाष्टा नितीन दिलीप चित्ते ,प्रकाश ह्यार, मिलिंद कांबळे समता नगर सातपूर कॉलनी ,दुपार जेवण- गणपत पांडुरंग गावले सहावा मैल पिंपळगाव बहुला, सायंकाळची भोजन- वै पोपट वाळू मोरे यांच्या स्मरणार्थ रवींद्र पोपट मोरे खंबाळे यांच्या वस्तीवर, मंगळवार १७ जानेवारी रोजी जगन्नाथ शिरसाठ कोटमगावकर अंजनेरी यांच्याकडे सकाळचा नाष्टा ,दुपारचे जेवण- सुखदेव नरहरी धामोडे वनसगाव ह मु सातपूर नाशिक, सायंकाळ जेवण कै मधुकर पंढरीनाथ कापडी यांचे स्मरणार्थ शैलेश मधुकर कापडी वनसगाव, बुधवार १८ जानेवारी रोजी सकाळच्या नाष्टा- शामराव बाबासाहेब शिंदे वनसगाव त्रंबकेश्वर येथे दुपारचे संत पूजन गणपत नाना वावधाने भरवस यांच्या स्मरणार्थ व वै लीलाबाई दत्तात्रय शिंदे वनसगाव यांच्या स्मरणार्थ सायंकाळचे भोजन, ह भ प निवृत्ती महाराज शिंदे खडक माळेगावकर यांचे कीर्तन होईल. वै मधुकर भागुजी शिंदे यांच्या स्मरणार्थ तानाजी मधुकर शिंदे खडक माळेगाव,गुरुवार १९ जानेवारी रोजी श्रीमती वै हभप भागीरथीबाई रामदयाल सारडा मातोश्री यांचे स्मरणार्थ त्रंबकेश्वर येथे महाप्रसाद होणार आहे.
ठिकाण- श्रीमंत देवराज पुरी गोदावरी अहिल्या संगम जुने महादेव मंदिर त्रंबकेश्वर दक्षिण दरवाजा त्रंबक.

